शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:53+5:302020-12-30T04:30:53+5:30
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली या संघटनेची निवडणूक उद्या, गुरुवारी होणार होती. त्यासाठी विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी ...

शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेची निवडणूक बिनविरोध
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली या संघटनेची निवडणूक उद्या, गुरुवारी होणार होती. त्यासाठी विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी एकूण २५ अर्ज दाखल केले होते. मात्र, सदस्य संख्या अवघी ११७ असल्याने आणि निवडणूक लागल्यास त्यातून वाद होऊन विनाकारण विद्यापीठाची बदनामी होऊ नये यासाठी सर्व सदस्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव डॉ. आर. व्ही. गुरव आणि एन. बी. गायकवाड यांनी मांडला. त्याला अन्य सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर त्यासाठी प्रा. जी. एस. गोकावी, एस. एस. महाजन, पी. एम. गुरव या ज्येष्ठ सदस्यांची समिती नियुक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये सदस्यपदी डॉ. शंकर हंगीरगेकर (रसायनशास्त्र), नितीन कांबळे (प्राणिशास्त्र), उदय पाटील (तंत्रज्ञान), मीना पोतदार (भूगोल विभाग), प्रकाश बिलावर (ग्रंथालयशास्त्र), राजीव व्हटकर (भौतिकशास्त्र), आसावरी जाधव (पर्यावरणशास्त्र) यांची निवड झाली. या कार्यकारिणीचा कालावधी दि. १ जानेवारी २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२१ असा राहणार आहे.
चौकट
विकास आघाडीचे सहाजण
नव्या कार्यकरिणीतील अध्यक्ष, सचिवासह डॉ. हंगीरगेकर, कांबळे, पाटील आणि पोतदार हे सदस्य विद्यापीठ विकास आघाडीचे आहेत. उपाध्यक्ष, कोषाध्यक्षांसह डॉ. बिलावर, व्हटकर, जाधव हे विकास मंचचे सदस्य आहेत.
फोटो (२९१२२०२०-कोल-नंदकुमार मोरे (विद्यापीठ), मानसिंग निंबाळकर (विद्यापीठ), ज्योतीप्रकाश यादव (विद्यापीठ), सतीश काळे (विद्यापीठ)