सनातन लोखंडे यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST2020-12-25T04:19:24+5:302020-12-25T04:19:24+5:30

कोडोली : येथील सामाजिक कार्यकर्ते सनातन ऊर्फ सनी लोखंडे यांची पन्हाळा तालुका विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र ...

Election of Sanatan Lokhande as President | सनातन लोखंडे यांची अध्यक्षपदी निवड

सनातन लोखंडे यांची अध्यक्षपदी निवड

कोडोली : येथील सामाजिक कार्यकर्ते सनातन ऊर्फ सनी लोखंडे यांची पन्हाळा तालुका विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी निवड कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सनातन लोखंडे यांचा निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोडोली येथील तुषार चिकुर्डेकर यांची कोडोली शहराध्यक्षपदी, अक्षय बुगले यांची कोडोली शहर उपाध्यक्षपदी, तर रमेश मेनकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार सेना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, इचलकरंजी जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर, शहर अध्यक्ष प्रताप पाटील, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी, शाहुवाडी तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड आदी उपस्थित होते.

फोटो २४ सनातन लोखंडे यांची निवड

Web Title: Election of Sanatan Lokhande as President