पंडेवाडीत एका जागेसाठी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:33+5:302021-01-13T05:01:33+5:30
सोळांकूर : पंडेवाडी ( ता. राधानगरी ) येथील ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, सर्वसाधारण गटातील प्रभाग क्रमांक ...

पंडेवाडीत एका जागेसाठी निवडणूक
सोळांकूर : पंडेवाडी ( ता. राधानगरी ) येथील ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, सर्वसाधारण गटातील प्रभाग क्रमांक १ मधील महिला जागेसाठी निवडणूक होणार आहे. येथील ९ जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या ग्रामपंचायतीवर गेली पंचावन्न वर्षे सुभाष चौगुले गटाची सत्ता असून, चौगुले यांनी पंचवीस वर्षे सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे.
येथील नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, याठिकाणी १,३११ मतदार आहेत. काँग्रेस पक्षाला सहा तर राष्ट्रवादी पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व काँग्रेसचे सुभाष चौगुले यांच्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होत आहे. या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये प्रकाश बंडोपंत पाटील, बळवंत दिनकर पाटील, वैशाली अशोक बारड, रोहिणी संजय चौगुले, उमेश मारुती पाटील, रशिदा रसूल मुल्लानी, सविता शांताराम चौगुले, शिवाजी सुभाष चौगुले यांचा समावेश आहे तर प्रभाग क्रमांक १ मधून विमल पांडुरंग पाटील व स्नेहल संतोष कांबळे यांच्यामध्ये लढत होत आहे.