शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले; कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लजसाठी २८ एप्रिलला मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:00 IST

सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

कोल्हापूर : ‘कोल्हापूर’, ‘जयसिंगपूर’ व ‘गडहिंग्लज’ बाजार समित्यांसाठी सोमवार (दि. २७) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. तिन्ही बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार होती. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने निवडून आलेले विकास संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार यादीत समाविष्ट करण्याची तरतूद नव्हती. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर संबंधित संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर प्रक्रिया तातडीने सुरू करून ३० एप्रिल २०२३ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, सोमवारी अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक प्राधीकरणाने मंगळवारी प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून ३ एप्रिलपर्यंत मुदत राहणार आहे. माघारीची मुदत २० एप्रिल असून २८ एप्रिलला मतदान होणार आहे. तिन्ही बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू झाल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे.असा राहणार निवडणूक कार्यक्रम :

  • उमेदवारी अर्ज दाखल करणे : २७ मार्च ते ३ एप्रिल
  • अर्जांची छाननी : ५ एप्रिल
  • माघारीची मुदत : ६ ते २० एप्रिल
  • मतदान : २८ एप्रिल
  • मतमोजणी : मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत

राज्यातील २४९ समित्यांचे बिगुल वाजलेकोरोनामुळे सर्वच निवडणूका लांबणीवर पडल्या. त्यानंतर विकास संस्था, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे पुन्हा पुढे ढकलल्या. आता प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले आहे.

‘कोल्हापूर’चे निवडणूक अधिकारी मालगावेकाेल्हापूर बाजार समितीसाठी सहायक निबंधक प्रदीप मालगावे, ‘गडहिंग्लज’ साठी सहायक निबंधक अमित गराडे तर ‘जयसिंगपूर’ साठी प्रेमदास राठोड यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकmarket yardमार्केट यार्ड