शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: राजाराम कारखान्याची २० मार्चपासून रणधुमाळी?, १३ हजार ५३८ सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:59 IST

विरोधी गटाने घेतलेल्या सर्वच हरकती फेटाळून लावल्या

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांची प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये १३ हजार ४०९ व्यक्ती सभासद तर १२९ संस्था सभासदांचा समावेश आहे. २० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन २३ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे.‘राजाराम’ कारखान्याच्या प्रारुप यादीवर हरकती व सुनावणीची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. त्यानुसार विरोधी गटाने घेतलेल्या सर्वच हरकती फेटाळून लावल्या. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी १३ हजार ४०९ व्यक्ती सभासद व १२९ संस्था सभासदांची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या पुढे व वीस दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविता येते.

सहसंचालक कार्यालयातील हालचाली पाहता तातडीने निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार २० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. छाननी, माघारीची प्रक्रिया पाहता साधारणता २३ एप्रिलला मतदान होऊन २५ एप्रिलला मतमोजणी होऊ शकते.नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी?‘राजाराम’ साखर कारखान्याची निवडणूक संवेदनशील असल्याने ती महसूल यंत्रणेकडे द्यावी, असा प्रयत्न आहे. त्यातूनच करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची चर्चा आहे. मात्र गेल्या दोन दिवसांतील हालचाली पाहता जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्ती होण्याची शक्यता आहे.असा राहू शकतो निवडणूक कार्यक्रम :उमेदवारी अर्ज दाखल : २० ते २७ मार्चछाननी : २८ मार्चमाघारीची मुदत : २९ मार्च ते ११ एप्रिलमतदान : २३ एप्रिलमतमोजणी : २५ एप्रिल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने