शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निवडणुकीची माहिती आता ‘वेब पेज’वर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:10 IST

प्रविण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकांची माहिती चटकन उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेब पेज तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व माहिती भरण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीच याचा वापर होणार असून, लवकरच त्याला सुरुवात होणार आहे.मतदार संघ, मतदान केंद्रे, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान ...

प्रविण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकांची माहिती चटकन उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेब पेज तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व माहिती भरण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीच याचा वापर होणार असून, लवकरच त्याला सुरुवात होणार आहे.मतदार संघ, मतदान केंद्रे, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणूकविषयक पुस्तके, राजकीय पक्ष, निवडणूकविषयक कायदे, मतदान यंत्रे, मतदान जनजागृती अभियान, आदींची माहिती एकत्रितरीत्या अधिकाºयांसह कर्मचाºयांना सहजरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने हे निवडणुकीचे वेब पेज तयार केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून हे पेज तयार केले आहे. त्याला ‘एनआयसी’च्या माध्यमातून तांत्रिक हातभार लावण्यात आला आहे.आॅनलाईनद्वारे भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्च केल्यानंतर हे पेज पाहायला मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ते उघडले जाऊन त्यामध्ये निवडणूकविषयक माहिती समोर येणार आहे. देशापासून गावापर्यंतच्या निवडणूक यंत्रणेची इत्थंभूत माहिती या माध्यमातून मिळणार आहे. अशा सुविधेची सुरुवात बहुधा कोल्हापुरातूनच पहिल्यांदा होत आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी याचा वापर केला जाणार आहे. किंबहुना कर्मचाºयांना निवडणूकविषयक माहिती चटकन मिळावी, यामध्ये जास्त वेळ जाऊ नये, हे डोळ्यांसमोर ठेवूनच जिल्हा प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. येणाºया काळात याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. कर्मचारी-अधिकाºयांबरोबरच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांनाही याचा उपयोग होऊ शकतो; परंतु प्रशासनाकडून सध्या तरी याचा विस्तार करण्याचा कोणताही विचार दिसत नाही.वेब पेजवर ही असेल माहितीउमेदवार, राजकीय पक्ष, उमेदवारीसह अन्य अर्ज, मतदान यंत्रे, प्रशिक्षण साहित्य, मतदान जनजागृतीसंदर्भातील प्रयोग, ओव्हरसीज व्होटर्स पोर्टल, सर्व्हिस व्होटर पोर्टल, नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल, नॅशनल ग्रीव्हॅन्सेस सर्व्हिस पोर्टल, आय.टी. अ‍ॅँड आॅटोमेशन डिव्हिजन, आदी स्वरूपांतील माहिती या वेब पेजवर असेल.निवडणूकविषयक पुस्तकांचीही माहिती वेबपेजवरनिवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती या वेब पेजवर असणार आहे. यामध्ये मॅन्युअल आॅन इलेक्शन रेग्युलेटरी आॅडिट-२०१६, हॅँडबुक फॉर एआरओ अ‍ॅँड एईआरओ सर्टिफिकेशन-पार्ट- १ व २, मॅॅन्युअल आॅन स्विप, मॅन्युअल आॅन डिस्ट्रिक्ट इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅनिंग, मॅन्युअल आॅन पोलिंग स्टेशन अशा २० हून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.