शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेसच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरविणारी निवडणूक

By admin | Updated: October 8, 2015 00:31 IST

सतेज पाटील यांची कसोटी : महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान; नेत्यांची तोेंडे चार दिशेला, पण कार्यकर्त्यांना आधार द्यावा लागणार

विश्वास पाटील-- कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. केंद्रात व राज्यातही आता पक्षाची सत्ता नाही. चार प्रमुख नेत्यांची चार दिशेला तोंडे असताना कार्यकर्त्यांना आधार देत काँग्रेसला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. गतनिवडणुकीत काँग्रेसच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या व २२ ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. आता हे वैभव राखण्यासाठी काँग्रेसला बरेच झगडावे लागणार आहे.माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला. पाठोपाठ राजाराम कारखाना, ‘गोकुळ’मध्येही त्यांना अपयश आले. जिल्हा बँकेतून त्यांनी स्वत:हून अंग काढून घेतले. बाजारसमितीत त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळाली. महापालिकेतील सत्ता ही त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची आणि एकमेव सत्ता आहे. या निवडणुकीत चांगल्या जागा निवडून आल्या तर त्यांना पुन्हा ‘किंगमेकर’ होण्याची संधी आहे. ही संधी मिळणार नाही यासाठी भाजपसह महाडिक गट व ताराराणी आघाडी ताकदीने कामाला लागली आहे. कोल्हापूरच्या राजकारणातील खरा ‘किंगमेकर’ कोण हेच काँग्रेसच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. गतनिवडणुकीत तत्कालीन आमदार सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली; परंतु त्यावेळीही नेत्यांत एकवाक्यता नव्हती. त्यामुळे उमदेवारी देताना पायात पाय घालण्याचे व आपल्याच पक्षातील विरोधी नेत्यांचे कार्यकर्ते असलेल्या उमेदवारास ठरवून पाडण्याचे राजकारण खेळले गेले. कसबा बावड्यातील प्रभागात शाहू आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल. हे कुरघोडीचे राजकारण उमेदवारी देण्यापासूनच खेळले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळण्याचे तेच महत्त्वाचे कारण होते. एवढे होऊनही काँग्रेसची निवडणुकीतील कामगिरी सरस राहिली. त्यामागे राज्यातील सत्ता हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण होते. राज्यात सत्ता असल्याने निधी येईल व शहराचा विकास होईल अशी भावना लोकांत असते. त्याचाही परिणाम मतांवर होतो. ज्यांना कोणीही निवडून आले तर फारसा फरक पडत नाही असा मोठा वर्ग मतदान करताना किमान या पद्धतीने विचार करतो. या निवडणुकीत काँग्रेसच्या मार्गातील हीच सगळ््यात मोठी अडचण आहे. दुसरी अडचण ही की पाच वर्षांत दोन्ही काँग्रेसचीच सत्ता महापालिकेत होती. थेट पाईपलाईन, केशवराव भोसले नाट्यगृहाचा विकास यासारखी शहर विकासावर दूरगामी परिणाम करणारी काही कामे झाली असली तरी दैनंदिन व्यवहारावर, प्रशासनावर फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यात रस्ते विकास प्रकल्पासारखे वादग्रस्त प्रकरण विधानसभेलाही काँग्रेसला चांगलेच शेकले म्हणजे सत्ता देऊनही लोकांच्या समस्या सोडविण्यात, लोकाभिमुख कारभार करण्यात म्हणावे तसे यश आले नाही. नेत्यांचे ‘व्हीजन’ काय असले तरी महापालिकेचा रोजचा व्यवहार काय अनुभवण्यास येतो हे जास्त महत्त्वाचे असते. त्या पातळीवरही काँग्रेसला मान वर करून सांगता येईल असे ठळक काम दिसत नाही.या निवडणुकीत आमदार महाडिक यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या घडामोडीतून अंग काढून घेतले. अंग काढून घेतले असले तरी ते शांत बसलेले नाहीत. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून ते पडद्याआडून सक्रिय आहेत. युवराज मालोजीराजे हे निवडणुकीत सक्रिय नसले तरी त्यांनी आपल्या शिलेदारांना ताराराणीच्या छावणीत धाडले आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा तसा शहरातील राजकारणातील वावर मर्यादित आहे. त्यामुळे यावेळेला जी काय लढाई लढायची आहे ती एकट्या सतेज पाटील यांनाच. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यापासून प्रचारापर्यंत त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्याचा एक फायदा असाही आहे की महापालिकेतील जे काही यश असेल ते त्यांच्या प्रयत्नांचे असेल. यश-अपयशाचे तेच धनी असतील. जो काही विरोध असेल तो उघडपणाने असेल. लोकसभा व विधानसभेला काँग्रेसचा हात तेवढा नको, अशी जनभावना झाली होती. त्यास आता वर्ष होऊन गेले आहे. हात बाजूला करून ज्यांना सत्तासूत्रे दिली त्यांच्याकडूनही दोन्ही सरकारच्या पातळीवर सामान्य माणसांच्या जगण्यात म्हणावा तसा बदल झाल्याचा अनुभव नाही. उलट गोरगरिबांच्या अडचणीच सरकारने वाढविल्या आहेत. या सगळ््यांचा परिणाम या मतदानांवर होणार आहे. तो काँग्रेसला उभारी आणणारा असेल की पुन्हा मागे सारणारा, हीच खरी उत्सुकता आहे. सहा ठिकाणी मानहानीगतनिवडणुकीवेळी देशात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला सहा प्रभागांत मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. त्यामध्ये खरी कॉर्नर प्रभागातून चंद्रकांत राऊत यांना अवघी ६८ मते मिळाली. तटाकडील तालीम प्रभागातून लक्ष्मीबाई वाझे यांना कशीबशी १२५, ताराबाई पार्क प्रभागातून गीता संकपाळ यांना १३८, शिवाजी उद्यमनगर प्रभागातून भारती घाटगे यांना १५४, संभाजीनगर बसस्थानक प्रभागात वैशाली महाडिक यांना १६३, पांजरपोळमधून सुभाष जाधव यांना २८५ मते मिळाली.आठजण ‘ताराराणी’तूनगेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेले आठ नगरसेवक या निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत. त्यामध्ये प्रकाश नाईकनवरे व त्यांची सून (पत्नीऐवजी), सत्यजित कदम, किरण शिराळे, रवी इंगवले (आता पत्नी), रणजित परमार (आता भाऊ ईश्वर परमार), राजू घोरपडे (आता पत्नी) आणि राजाराम गायकवाड यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभागातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले काँग्रेसचे राजसिंह शेळके हे यावेळेला ‘ताराराणी’च्या तंबूत आहेत.नवखे उमेदवारकाँग्रेसने आतापर्यंत ६९ उमेदवार जाहीर केले आहेत. अजून जिथे जास्त रस्सीखेच आहे, अशा १२ प्रभागांची नावे जाहीर व्हायची आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीवर नजर टाकल्यास काही तगडे उमेदवार निश्चित असले तरी बरेच नवखे उमेदवारही यादीत दिसत आहेत. अशा उमेदवारांना घेऊन लढत देताना काँग्रेसची व नेत्यांचीही चांगलीच कोंडी होणार आहे.