शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लेझीम स्पर्धेत खेळतानाच वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू, नवरात्रोत्सवातच घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:44 IST

निवास वरपे  म्हालसवडे : कसबा आरळे (ता.  करवीर) येथील ग्रामदैवत कामाख्या देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या लेझीम स्पर्धेत खेळत असताना ...

निवास वरपे म्हालसवडे : कसबा आरळे (ता.  करवीर) येथील ग्रामदैवत कामाख्या देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या लेझीम स्पर्धेत खेळत असताना शंकर हरी गोते (वय ६५, रा. गोतेवाडी, ता. राधानगरी) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ग्रामपंचायतीच्या समोरील खचाखच भरलेल्या मैदानातील प्रेक्षकांसमोरच काल, बुधवारी (दि. १८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.येथील कामाख्या तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी मर्दानी खेळांच्या किंवा पारंपारिक वाद्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील दहा संघांनी सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध नियोजन व सामाजिक संदेश देणारे प्रत्येक संघाचे उत्कृष्ट सादरीकरण यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी अबालवृद्धांसहित महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.प्रत्येक संघाला बारा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. गोतेवाडी येथील लोळजाई लेझीम मंडळ हे शेवटचे स्पर्धक होते. त्यांचा दहा मिनिटांचा कालावधी संपून शेवटच्या दोन मिनिटांचे सादरीकरण करत असतानाच लोळजाई मंडळातील पट्टीचे खेळणारे वयोवृद्ध खेळाडू  शंकर गोते हे अचानक खाली कोसळले. कसेबसे शेजारील पिंपळाच्या पाराला टेकून बसले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शंकर गोते यांचे पंचक्रोशीत हलगी, लेझीम, दांडपट्टा व मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांबद्दल खूप मोठे नाव आहे. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे गोतेवाडी सहित कसबा आरळे गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी,  पाच विवाहित मुली, मुलगा व सून असा परिवार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू