शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:18 IST

पीपीई किट नसल्याची अफवा

कोल्हापूर : कोरोना संसर्ग झालेल्या एका ७३ वर्षीय वृद्धेचा रविवारी (दि. १) उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाबाधित वृद्धा मूळची पलूस (जि. सांगली) येथील असून, सध्या ती पाचगाव (ता. करवीर) येथील नातेवाइकांकडे आली होती. महापालिका प्रशासनाने पंचगंगा स्मशान घाट येथे वृद्धेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, आणखी २ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२ एवढी झाली.सीपीआर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव येथील कोरोनाबाधित वृद्धेवर चार दिवसांपासून सीपीआरमधील कोरोना उपचार विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला मधुमेह, किडनी विकारासह अन्य आजार होते. सीपीआर आणि महापालिका प्रशासनाने नातेवाइकांना कल्पना देऊन तिच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील नव्या दोन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२ एवढी झाली. त्यापैकी ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.

पीपीई किट नसल्याची अफवाकोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करणा-या महापालिकेच्या कर्मचा-यांना पीपीई किट नाहीत. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यास तयार नसल्याच्या अफवा सोशल मीडियातून व्हायरल झाल्या होत्या. महापालिकेने याबाबत तातडीने खुलासा करून महापालिकेकडे पुरेसे पीपीई किट असल्याचे स्पष्ट केले. तसेच पीपीई किट घालून मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याचे फोटो प्रसिद्ध केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या