कोल्हापुरात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST2021-03-30T04:13:30+5:302021-03-30T04:13:30+5:30
------------------------------------- कोल्हापुरात दोघांना मारहाण कोल्हापूर : राजेंद्रनगरात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. मंगेश ज्ञानबा गायकवाड (वय ...

कोल्हापुरात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
-------------------------------------
कोल्हापुरात दोघांना मारहाण
कोल्हापूर : राजेंद्रनगरात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. मंगेश ज्ञानबा गायकवाड (वय २५), अंबाजी श्रीरंग काळे (२९ दोघेही रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल झाली आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-------------------------------------
भरधाव दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : भरधाव दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. पूजा संतोष माणगावे (वय २९, रा. काशीद गल्ली, कोगनोळी, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. संतोष माणगावे हे आपली दोन लहान मुले व पत्नीसह दुचाकीवरून कोगनोळी ते कुरुंदवाड असा प्रवास करत होते. भरधाव दुचाकी पंचतारांकित औद्योगिक वसाहतजवळ आली असता, पाठीमागे बसलेल्या पूजा माणगावे यांचा दुचाकीवरून तोल जाऊन त्या खाली रस्त्यावर पडल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने दुपारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
-------------------------------------
कोल्हापुरात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर : रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाल्याने पोहण्यासाठी नदीत गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. अथर्व विजय गायकवाड (वय २८, रा. प्लॉट नं. २८, ए, शिवराम पोवार हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर बंधारा येथे पंचगंगा नदीत घडली. अथर्व याने पाण्यात उडी मारल्यानंतर तो पाण्यातून वर न आल्याने परिसरातील त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडा-ओरडा केला. त्यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.