भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

By Admin | Updated: July 17, 2015 23:07 IST2015-07-17T23:07:30+5:302015-07-17T23:07:30+5:30

भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

Eight Gram Panchayats unanimously elected from Bhudargarh | भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

शिवाजी सावंत - गारगोटीभुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्या आहेत. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे. खऱ्या अर्थाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे हे यश मानावे लागेल. स्थानिक पातळीवर सलोखा राहण्यात यामुळे मदत होईल.
गावपातळीवर राजकारणावरून टोकाचा संघर्ष केला जातो. घरापासून बांधापर्यंत हे वाद सुरू असतात. यामध्ये अनेक निष्पाप आणि निरपराध माणसे भरडलेली जातात. हे जाणून स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महत्त्वाकांक्षी असे महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. या अभियानामुळे हजारो खटले निकालात निघाले, तर किरकोळ वाद- विवाद हे स्थानिक स्तरावर सोडविले गेले. याचीच परिणती म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विशेष बक्षीस योजना जाहीर केली. गावा-गावांतील लोकांचा संघर्ष मावळला आणि खऱ्या अर्थाने लोकशाही रुजू लागली.
भुदरगड तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुरुक्टे, म्हासरंग, उकीरभाबळे, सोनुर्ली, वासनोली ही चार गावे बिनविरोध झालीत, तर माघारीच्या अखेरच्या दिवशी बसरेवाडी, नवले, तांब्याचीवाडी, पाळ्याचा हुडा ही आणखी चार गावे बिनविरोध झाली. यामध्ये खानापूर व गंगापूर ही दोन गावे केवळ एक-एक जागेकरिता निवडणूक लागल्याने बिनविरोध होण्यापासून वंचित राहिली. खानापूर हे गाव बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेहनत घेतली पण त्यांना अपयश आले, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांना त्यांचे गंगापूर गाव एक-एक जागेवर निवडणूक लागल्याने बिनविरोध करता आले नाही. याव्यतिरिक्त काही गावांतील ठरावीक जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले आहे. गावाच्या नावापुढील कंसात बिनविरोध सदस्य संख्या नांगरगाव (१), भेंडवडे (२), हेळेवाडी (२), नागणवाडी (२), बेगवडे (१), आदमापूर (१), पंडिवरे (१), लोटेवाडी (१), खेडगे-एरडंवे (२), पाटगाव-मानोपे (१), नितवडे (३), भमदापूर (५), मेघोली (२), मठगाव-मानी (४), नांदोली-करंबळी (१), भालेकरवाडी (५), शिवडाव (६), वळशिवणे (२), खानापूर (८), गंगापूर (८).

बिनविरोध झालेली गावे आणि त्यांचे सदस्य नावे पुढीलप्रमाणे - मुरुक्टे येथील अरुण हरी बेलेकर, चंद्रभागा उत्तम फगरे, राणी लक्ष्मण माने, शितल राजाराम जाधव, चंद्रकांत अंबाजी गुरव, मारुती परसू कांबळे, सखुबाई अशोक चव्हाण, बसरेवाडी येथील विठ्ठल पांडुरंग पाटील, वंदना दिनकर पाटील, आक्काताई शंकर साळवी, रवींद्र महादेव देवेकर, अनिल केशव सुतार, साऊताई बाबूराव पाटील, सुवर्णा गणपती ढेरे, म्हासरंग- उकीरभाटले या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी आरती अशोक कोटकर, सुरेखा उमेश कांबळे, बाळकू बापू कांबळे, विजय राजाराम चव्हाण, सविता महादेव पंदारे, मनीषा कृष्णा गुरव, जयदीप विठ्ठल साठे, ननहुबी आदम शेख, शोभा आनंदा धुरी. पाळ्याचा हुडा - संजय बळवंत गुरव, लक्ष्मी जयसिंग शिंदे, हौसाबाई प्रकाश हजाम, संजीवनी संतोष किल्लेदार, नामदेव श्रीपती कांबळे, सरिता श्रावण तेजम, सुरेश तेजम. सोनुर्ली - लक्ष्मी गुंडू कांबळे, बळवंत बाबूराव साळोखे, शिवाजी ईश्वरा काटकर, संगीता पंढरीनाथ महाडिक, नामदेव धोंडिराम पाटील, उज्ज्वला काटकर, सुषमा संभाजी काटकर. वासनोली - मानसिंग पांडुरंग पाटील, प्रियांका संतोष पोवार, गणपती शंकर गुरव, रत्नाबाई शिवाजी कांबळे, मधुकर रामचंद्र पाटील, शोभाताई कुंडलिक पाटील, लक्ष्मी शिवाजी कांबळे, नवले - दशरथ ज्ञानदेव चिले, वनिता सयाजी पाटील, बेबीताई आनंदा रब्बे, तानाजी मारुती देसाई, शिवाजी पाटील. तांब्याचीवाडी - वंदना एकनाथ लाड, प्रकाश आनंदा कांबळे, सुषमा सुरेश भालेराव, सुनील सोमा कांबळे, अस्मिता अशोक भालेकर, कृपा श्रीकृष्ण चौकेकर, प्रकाश काशीराम हाणफोडे.

Web Title: Eight Gram Panchayats unanimously elected from Bhudargarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.