गांधीनगरमध्ये आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:26+5:302021-05-11T04:24:26+5:30
गांधीनगर ( प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गडमुडशिंगी ता करवीर येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवसांचे कडक लाॅकडाऊन जाहीर ...

गांधीनगरमध्ये आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन
गांधीनगर ( प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गडमुडशिंगी ता करवीर येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवसांचे कडक लाॅकडाऊन जाहीर केला. गावच्या सीमा बंद करून प्रवेशद्वारावर बंदोबस्त तैनात करण्यात आला.
गावच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व गावात कोरोना महामारीचा संसर्ग वाढू न देण्याच्या हेतूने ग्रामपंचायत दक्षता समितीने १० मे ते १७ मेपर्यंत या आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. गावातील सर्व व्यावसायिकांनी प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, दूध डेअरी सुरू ठेवून बाकीचे सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. परगावातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणासाठी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे गावात शुकशुकाट पसरला आहे. विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व दक्षता समिती गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
फोटो ओळ - गडमुडशिंगी ता करवीर येथे आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला त्या अनुषंगाने गावच्या सीमा बंद करून ग्राम समितीने बंदोबस्त तैनात ठेवला आहे.