गडहिंग्लजमध्ये ईद साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST2021-05-15T04:22:20+5:302021-05-15T04:22:20+5:30
शहरातील सुन्नी जम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा, मदिना मस्जिद येथे प्रातिनिधिक स्वरूपात सकाळी ११ वाजता नमाज पठण करण्यात आले. ...

गडहिंग्लजमध्ये ईद साधेपणाने साजरी
शहरातील सुन्नी जम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा, मदिना मस्जिद येथे प्रातिनिधिक स्वरूपात सकाळी ११ वाजता नमाज पठण करण्यात आले.
यावेळी मौलाना मेहमूद रजा, मौलाना फईम मुल्ला, मौलाना अजिम पटेल यांनी खुतबा पठण केले. नमाज नंतर कोरोनाच्या संकटातून जगाची मुक्तता व्हावी. मानवी जीवन पूर्ववत होऊन समृद्धीसह ऐक्य व शांततेची भावना प्रस्थापित होण्यासाठी विश्व प्रार्थना करण्यात आली.
--------------------------------------
* नूलमध्ये ईद साधेपणाने
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे सामुदायिक नमाज पठण न करता जुम्मा मस्जिदीमध्ये मौलाना सिद्दीकी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजहान सनदी, कासिम काझी, ईस्माईल लाडखान यांनी प्रातिनिधिक स्वरूपात तसेच इतर मुस्लिम समाज बांधवांनी आपआपल्या घरी नमाज पठण केल्याची माहिती मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष तौशिफ बुढाण्णावर यांनी दिली.