महाविकास आघाडीत संघर्ष नको यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:10+5:302021-03-13T04:44:10+5:30

मुंबई येथे ‘गोकुळ’च्या निमित्ताने झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, आम्ही सध्या राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना महाविकास आघाडी ...

Efforts not to struggle in the Mahavikas front | महाविकास आघाडीत संघर्ष नको यासाठी प्रयत्न

महाविकास आघाडीत संघर्ष नको यासाठी प्रयत्न

मुंबई येथे ‘गोकुळ’च्या निमित्ताने झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, आम्ही सध्या राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत. हीच भूमिका गोकुळ किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राहावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मी, सतेज पाटील. आणि पी. एन. पाटील अशी बैठक मुंबईत झाली. या पुढच्या काळातदेखील याबाबत चर्चा सुरूच राहील. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या निवडणुकांच्या निमित्ताने संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तो टाळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यामुळे आता राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. पी. एन. पाटील यांनीही आपल्यासोबत यावे यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील प्रयत्नांत आहेत. मुश्रीफ यांनी मांडलेली भूमिका यालाच बळ देणारी असल्यामुळे आता नेमकी आघाडीची रचना कशी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Efforts not to struggle in the Mahavikas front