शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास ; टाळेबंदीतही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:18 IST

सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्नसंच दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच शिक्षक तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात.

ठळक मुद्दे शिक्षक, विद्यार्थी, पालकांचा सहभागप्रगत तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात

रत्नागिरी : कोरोनामुळे शाळेला सक्तीची सुट्टी पडली तरी येथील मुकुल माधव विद्यालयाने नियोजन करुन विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास पाठवला जातो आणि केलेला अभ्यास पालक शिक्षकांना पाठवतात. यामुळेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मिळून सारेजण टाळेबंदीतही विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत आहेत.कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्ट्या आहेत. मुकुल माधव विद्यालयामधील नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपमधून रोज सोडवायला सांगितल्या जातात. सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्नसंच दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच शिक्षक तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात.अभ्यासाव्यतिरिक्त देखील चित्रकला, रंगकाम आणि योगावर आधारीत व्हिडिओ पाठवून या तणावाच्या काळात मन शांत ठेवण्याचे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोळप सारख्या ग्रामीण भागामध्ये अशाप्रकारचा शहरी भागात राबविला जाणारा उपक्रम गावातील मुलांसाठी उपलब्ध झाल्याने पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात नियोजनपूर्वक आपला वेळ देऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना आवश्यक तांत्रिक उपकरणे घेऊन या शिक्षणाच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.स्काईपद्वारे वैयक्तिक शिकवण्याविद्यार्थीही परीक्षा नाही म्हणून अभ्यास करायचा नाही असे न करता शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करत आहेत. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना ह्यस्काईपह्णच्या माध्यमातून वैयक्तिक शिकवण्या घेतल्या जात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या हळूहळू संपर्कात येण्यासाठी मुकुल माधव विद्यालयातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी