शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:24 IST

डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.

ठळक मुद्देनवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमारकोल्हापूर रेल्वेस्टेशन पोस्ट आॅफिसच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

कोल्हापूर : डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.कोल्हापूर रेल्वेस्टेशन पोस्ट आॅफिसच्या नवीन वास्तूचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील, अधीक्षक अशोक खोराटे, रेल्वे स्टेशन पोस्ट आॅफिसच्या अधीक्षिका अंजनादेवी कोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार म्हणाले, पोस्ट विभागाचा चेहरा-मोहरा बदलला असून, नवीन चेहरा आणि वेगळे वातावरण पोस्ट आॅफिस निर्माण झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग सेवेसह अन्य सेवा अधिक गतिमान केल्या असून, या सुविधांद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत. बहुतांशी सर्व पोस्ट कार्यालये अधिक सुसज्ज आणि सुविधायुक्त झाली आहेत; त्यामुळे शासकीय सेवाही गतिमानतेने होत आहेत. संपूर्ण संगणकीकरणाद्वारे आॅनलाईन बँकिंगवर पोस्टाने अधिक भर दिला आहे.डाकघर विभागाच्या महसूल उत्पन्नामध्ये कोल्हापूर डाकघर विभागाची आघाडी असून यापुढेही कोल्हापूर डाकघर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमपणे काम करून महसूल उत्पन्नवाढीची ही आघाडी कायम ठेवावी, असे आवाहनही पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.यावेळी पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी अधिकारी-कर्मचाºयांशी संवाद साधून भविष्यात डाक विभागाची कामगिरी अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचे आवाहन केले. प्रारंभी कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी स्वागत करून नवीन इमारतीची तसेच कोल्हापूर डाकघर विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर डाकघर विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसkolhapurकोल्हापूर