शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा परिणाम; शिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्या परीक्षा स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:40 IST

स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा व या तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिवाजी विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल-२०२३ उन्हाळी सत्रातील बुधवार व गुरुवारी होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रमुख गावे, शहराशी जोडणारे मार्ग बंद झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन दिवशी होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित केल्या. स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल. २८ जुलैपासून परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे असे डॉ. जाधव यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी एमबीए, बीफार्मसी यासह तीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये सुरळीतपणे पार पडल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षा