शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील पुरस्कार सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:11+5:302021-01-16T04:27:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ...

शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील पुरस्कार सोहळा आज
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ७२ मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवकांना त्यांच्या नावे पुरस्काराने शनिवारी (दि.१५) दुपारी २.३० वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत, अशी माहिती डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
न्यू काॅलेजच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे विशेष उपस्थित राहणार आहेत. शिक्षक आमदार जयंत आसगावकर व आमदार अरुण लाड यांचाही विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मंचचे उपाध्यक्ष डी. एस. घुगरे, एस. के. पाटील, आर. वाय. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.