शिक्षण संस्थांनी सक्तीने फी वसुली करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:06+5:302021-07-14T04:28:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरातील पालकांकडून गेल्यावर्षीची शैक्षणिक फी शाळा सक्तीने वसूल करीत आहेत. याच्या निषेधार्थ ...

शिक्षण संस्थांनी सक्तीने फी वसुली करू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरातील पालकांकडून गेल्यावर्षीची शैक्षणिक फी शाळा सक्तीने वसूल करीत आहेत. याच्या निषेधार्थ भाजप विद्यार्थी आघाडीच्यावतीने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसूल करू नका, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सोनवणे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून, या ठिकाणी कामगारांची संख्या मोठी आहे. सध्या यंत्रमाग व्यवसाय बंद असल्याने पालकांनी शाळा व हायस्कूलची शैक्षणिक फी भरलेली नाही. त्यामुळे शाळांकडून विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास टाळाटाळ सुरू आहे. तसेच गतवर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी भरून चालू वर्षाची निम्मी फी भरल्याशिवाय पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यास शैक्षणिक संस्था नकार देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षणसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. तरीदेखील शैक्षणिक संस्था जबदरस्तीने फी वसूल करीत आहेत, असे म्हटले आहे. यावेळी मयूर कागलकर, तेजस शिंदे, निरज बनसोडे, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.