पश्चिम भागाचा आसगावकर यांच्यामुळे शैक्षणिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:26+5:302021-02-09T04:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या व ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासासाठी स्व. डी. डी. आसगावकर यांनी ...

Educational development of the western part due to Asgavkar | पश्चिम भागाचा आसगावकर यांच्यामुळे शैक्षणिक विकास

पश्चिम भागाचा आसगावकर यांच्यामुळे शैक्षणिक विकास

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या व ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासासाठी स्व. डी. डी. आसगावकर यांनी आपली हयात घालवली आहे. त्यांचे विचार समोर ठेवून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील व ग्रामीण भागातील मुलांच्या गुणवत्तेला स्पर्धेच्या युगात वाव दिला जाईल, असे प्रतिपादन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव स्व. डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालयात असणाऱ्या त्यांच्या स्मारकाला शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांंनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अध्यक्ष य. ल. खाडे, उपाध्यक्ष के. ना. जाधव, सहसचिव डी. एन. कुलकर्णी, संचालक डी. जी. खाडे, बी. डी. नाळे, मदन पाटील, कासोटे-सांगरूळचे सरपंच सदाशिव खाडे, प्राचार्य डॉ. कुरळपकर, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

फोटो - कोपार्डे (ता. करवीर) येथे स. ब. खाडे महाविद्यालयात डी. डी. आसगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Web Title: Educational development of the western part due to Asgavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.