अणूस्कुरा केंद्र शाळेस शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:37+5:302021-07-11T04:18:37+5:30

अणुस्करा : अणूस्कुरा (ता शाहूवाडी) येथील केंद्रशाळेस जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी भेट देऊन पाहणी ...

Education officials visit Anuskura Kendra School | अणूस्कुरा केंद्र शाळेस शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

अणूस्कुरा केंद्र शाळेस शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

अणुस्करा : अणूस्कुरा (ता शाहूवाडी) येथील केंद्रशाळेस जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. वर्षभरापासून शाळा बंद असल्या तरी या शाळेने विध्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी राबवलेल्या ‘शिक्षण आले दारी' हा उपक्रम, पंचायत समिती शाहुवाडीने तालुक्यात सुरू केलेले शाळेतील समूह अध्ययन तसेच मुलींच्या आनंददायी शिक्षणासाठी नांदी फाउंडेशनचा ‘नन्ही कली’ या उपक्रमांची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. या शाळेत वाकीचा धनगरवाडा, मोसम या वस्तीवरून पाच- सहा किलोमीटर पायी येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले, येथील मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही वेगळे, उपक्रम घेता येतील का याविषयी शिक्षकांसोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या समन्वयक आम्रपाली देवेकर, शाहुवाडीचे गट शिक्षणाधिकारी उदय सरनाईक , शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री जाधव यांच्यासह शिक्षक प्रकाश गाताडे, अमोल काळे, कल्लापा पाटील उपस्थित होते. केंद्र समन्वयक दशरथ आयरे यांनी आभार मानले.

फोटो :-अणूस्कुरा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी संवाद साधला.

१० अणूस्कुरा आशा उबाळे

Web Title: Education officials visit Anuskura Kendra School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.