शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यच्या बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, दीपक केसरकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:36 IST

‘संजय राऊत यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवायला नको,’

कोल्हापूर : केवळ बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, असा टोला शालेय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लगावला. ‘संजय राऊत यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवायला नको,’ अशीही शेरेबाजी त्यांनी यावेळी केली.केसरकर पंढरपूरला विठ्ठलदर्शन करून कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कामत उपस्थित होते. केसरकर म्हणाले, यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांचे दर्शन सुरू ठेवून मुख्यमंत्र्यांनी वि्ठ्ठलदर्शन घेतले. पंढरपूरच्या विकासासाठी निधी दिला. वारकऱ्यांना बाटलीबंद पाणी दिले. सर्वांसाठी उपलब्ध असणारे असे हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी येणारी विधानसभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे जाहीर केले असल्यामुळे आणि हे दोन्ही नेते समजूतदार असल्याने काहीही अडचण येणार नाही.

कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर येणार म्हणूनच मोर्चाचे नियोजन केले गेले. जी कंपनी पुण्यात ब्लॅकलिस्ट होते, ती मुंबई महापालिकेला चालतेच कशी? लोकांच्या जिवाशी खेळण्याचा हा सर्व प्रकार होता. समान नागरी कायदा झाला पाहिजे, हीच भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. याबाबत केंद्र सरकार काही निर्णय घेत असेल आणि त्यातून सर्वांना समान न्याय मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

पवारांनी स्वाभिमानामुळेच उठाव केलाशरद पवार यांचे खच्चीकरण करण्याचा कॉंग्रेसकडून सातत्याने प्रयत्न सुरू होता; म्हणूनच स्वाभिमानाने शरद पवार यांनी कॉंग्रेसविरोधात उठाव केला. आमचाही पक्ष संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू होता; म्हणूनच आम्हीही उठाव केला. त्यामुळे पवारांचा ‘उठाव’ आणि आमची ‘गद्दारी’ असे म्हणता येणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना