खाद्य तेल प्रति किलो २-४ रुपयांनी स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:47+5:302021-09-13T04:22:47+5:30
कोल्हापूर : खाद्यतेलाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यामुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल ...

खाद्य तेल प्रति किलो २-४ रुपयांनी स्वस्त
कोल्हापूर : खाद्यतेलाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यामुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल स्थानिक बाजारात २ ते ४ रुपयांनी स्वस्त झाले.
खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे. यावरून केंद्र सरकारवर जनतेतून टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने मागील महिन्यात आयात कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कच्चा पाम तेलावरील आयात कर ३०.२५ टक्के होता. तो आता २४.७ टक्के करण्यात आला आहे. आयात कमी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठेत तेलाचे दर दोन ते चार रुपयांनी कमी झाले. तेलबिया व तेलाचा साठा करण्यावरही मर्यादा घातली आहे. या निर्देशाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचेही संकेत केंद्राने दिले आहेत.
खाद्य तेलाचे प्रति किलोचे दर असे, (कंसातील पूर्वीचे दर)
शेंगदाणा तेल - (१८४ रु.) - १८२ रु.
सूर्यफुल तेल - (१८६ रु.) - १८० ते १८२ रु.
सरकी तेल (१६४ रु.) - १६० रु.
सोयाबीन तेल - (१६२ रु.) - १६० रु.
पामतेल - (१४२ रु.) - १४० रु.
कोट
केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले आहेत. मात्र, ते म्हणाव्या तितक्या प्रमाणात कमी झालेले नाहीत. याशिवाय नवीन तेलबिया बाजारात येत नाहीत. तोपर्यंत दरात मोठी घसरण शक्य नाही.
केतन तवटे, तेल व्यापारी,