शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:35 IST

Radhanagri, forestnews, sindhdurgnews, kolhapurnews, gagette राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ४१ गावे इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झाली असून तशी अंतिम अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढले आहे.

ठळक मुद्देइको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढलेअधिसूचना जारी : कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश

कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ४१ गावे इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झाली असून तशी अंतिम अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढले आहे.या नव्या अधिसूचनेमुळे २५,०६५.८८ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र आता प्रतिबंधित झाले आहे. यामध्ये १८,८८७.९४ हेक्टर जंगल क्षेत्राचा, तर ६,१७७.९४ हेक्टर जंगलाबाहेरच्या क्षेत्राचा समावेश आहे. वन्यजिवांच्या संवर्धनासाठी राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारीही बाजूंनी २०० मीटर ते ६.०१ किलोमीटर परिसरातील गावे आता संवेदनशील झोन म्हणून संरक्षित झाली आहेत. ही अधिसूचना १५ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने राधानगरी अभयारण्याच्या विस्ताराचा निर्णय घेतला होता. यासाठी १० जुलै २०१९ रोजी अधिसूचना जारी करून संभाव्य संवेदनशील क्षेत्रातील गावांमधून हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. अनेक गावांनी तसेच वनविभागानेही काही सूचना आणि हरकती घेतल्या होत्या. पूर्वीच्या प्रस्तावात अभयारण्यापासून १० किलोमीटरच्या हवाई अंतर क्षेत्रातील गावांत केंद्र सरकारने निर्बंध घातले होते, ते आता कमी करून ६.०१ किलोमीटर इतके केले आहे.या गावांचा अतिरिक्त समावेशपूर्वी फक्त राधानगरी तालुक्यापुरते मर्यादित असलेले राधानगरी अभयारण्याचे क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढलेले आहे. कोल्हापूर विभागात गगनबावडा तालुक्यातील बावेली, तळेखुर्द, बोरबेट, सालगाव, गारिवडे, राधानगरी तालुक्यातील कंदलगाव, मानबेट, राही, पडसाळी, दुर्गमानवाड, पिरळ, सोन्याची शिरोली, बुजवडे, हेळेवाडी, पनोरी, फराळे, लिंगाचीवाडी, ऐनी तसेच भुदरगड तालुक्यातील फये, हेदवडे, येरंडपे, वासणोली, कोंडोशी, करंबळी, अंतुर्ली, शिवडाव या २६ गावांचा समावेश या झोनमध्ये आहे.सावंतवाडी विभागातील कुडाळ तालुक्यातील दुर्गानगर, यवतेश्वर, जांभळगाव, कणकवलीतील नरडवे, रांजणगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्वरनगर, गांधीनगर, हरकूळ खुर्द, फोंडा, घोणसरी, वैभववाडी तालुक्यातील कुर्ली, शिराळे या १५ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग