शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सोनाळीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:48 IST

निवास वरपे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणारे करवीर तालुक्यातील सोनाळी हे गाव. गेली सत्तर वर्षे अखंडितपणे या गावात रंगविरहित गणेशमूर्ती घरोघरी बसवल्या जातात. गावातील तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीही रंगविरहित अशा शाडू मातीच्याच आहेत. गेली काही वर्षे डॉल्बीमुक्ती व ...

निवास वरपे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणारे करवीर तालुक्यातील सोनाळी हे गाव. गेली सत्तर वर्षे अखंडितपणे या गावात रंगविरहित गणेशमूर्ती घरोघरी बसवल्या जातात. गावातील तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीही रंगविरहित अशा शाडू मातीच्याच आहेत. गेली काही वर्षे डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थित विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील ग्रामस्थांनी चालवली आहे.शेतीबरोबर दुग्ध उत्पादन हा सोनाळीच्या ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने या गावाला शासकीय सोयी-सुविधांचा अभाव आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक शेती कोरडवाहू आहे. १७२० लोकसंख्या असलेल्या सोनाळीत ग्रामपंचायत, दोन सेवा संस्था, तीन दूध संस्था व दोन तरुण मंडळे आहेत. तरुणांनी पांरपरिक वाद्याची कला जोपासली असून, मंडळाच्या माध्यमातून झांजपथक, ढोल-ताशे, लेझीम मंडळ व भजनी मंडळ चालवली आहेत.सोनाळीचे मुख्य ग्रामदैवत ‘धाकेश्वर’ असून, गावात हनुमान व मरगुबाई देवीची मंदिरे आहेत. येथे ज्ञानेश्वरी पारायण, दसरा महोत्सव व महाशिवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसवलेला चालत नाही, अशी आख्यायिका आहे. देवाचा कोप होऊ नये या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या मूर्ती बसवतच नाहीत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया या गावाचे नाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे. या गावात रंगीत गणेशमूर्ती बसवल्या जात नसल्याचे पंचक्रोशीला परिचित असल्याने गावातील युवकांनी याचा आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘धाकेश्वर’ व ‘जयशिवराय’ या दोन्ही तरुण मंडळांनी गेली वीस वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव इको फ्रेंडली व पर्यावरणपूरक असा साजरा करण्याची प्रथा चालवली आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व वयोवृद्ध मंडळी गौरी गणपतीच्या सणावर विशेष लक्ष देऊन असतात. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्याने, महाप्रसाद व प्रबोधनांचे आयोजन केले जाते. महिलांनी गौरी आवाहन व विसर्जनादरम्यान जुन्या रीतीरिवाज, परंपरा संभाळत प्रदूषणमुक्तीचा वसा निर्माण केला आहे.शेजारील म्हालसवडे गावातील कुंभार बलुतेदारी पद्धतीने शाडू मातीच्या गणेशमूर्ती संपूर्ण सोनाळी गावाला पुरवतात. येथे सव्वाशे घरगुती व दोन तरुण मंडळांच्या शाडू मातीच्या व रंगविरहित गणेशमूर्ती आहेत. सोनाळी गाव पर्यावरणपूरक व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरे करत असल्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यायला हवा. करवीर पोलिसांनी या गावाचे विशेष कौतुक केले आहे.