खा. संभाजीराजे भाजपाचे सहयोगी सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:49 IST2017-08-04T03:49:05+5:302017-08-04T03:49:05+5:30

कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

 Eat SambhajiRaj BJP associate member | खा. संभाजीराजे भाजपाचे सहयोगी सदस्य

खा. संभाजीराजे भाजपाचे सहयोगी सदस्य

कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेणे यात काहीही नवीन नाही. राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी संंबंधित खासदारांना आपला पक्ष किंवा अपक्ष राहणार असेल तर तसे स्पष्ट करावे लागते. मात्र, या सन्मानाच्या पदावर दिलेली संधी, महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची मिळणारी संधी, मराठा आरक्षणापासून अनेक प्रश्नांबाबत लागणारे पाठबळ याचा विचार करून मी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. मी भाजपमध्ये गेलो नाही तर सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

Web Title:  Eat SambhajiRaj BJP associate member