नैऋत्य चीनमध्ये भूकंप; १ ठार, ३२४ जखमी
By Admin | Updated: October 10, 2014 00:29 IST2014-10-09T03:16:00+5:302014-10-10T00:29:01+5:30
मंगळवारी रात्री चीनच्या नैऋत्येकडील भाग भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.६ एवढी होती

नैऋत्य चीनमध्ये भूकंप; १ ठार, ३२४ जखमी
बीजिंग : मंगळवारी रात्री चीनच्या नैऋत्येकडील भाग भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.६ एवढी होती. या भूकंपाच्या तडाख्यात १ जण ठार, तर अन्य ३२४ जण जखमी झाले आहेत. युन्नान प्रांताला या भूकंपाचा जबर तडाखा बसला. जिंगी दाई आणि यी या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. युन्नान हा प्रांत भूकंपप्रवण आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जिंगीस्थित होता. जवळपास ९२ हजार ७०० लोकांना भूकंपाचा तडाखा बसला असून या भागातून ५६ हजार ८८० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.