शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीच कधीतरी आपल्याला नष्ट करेल, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:43 IST

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी ...

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे. विविध शास्त्रज्ञांनी शास्त्रीय अभ्यासातून हे दाहक चित्र स्पष्ट करूनही राजकीय नेते, लोकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना ते कसे कळत नाही? असा सवाल पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी शुक्रवारी उपस्थित केला. शिवाजी विद्यापीठ व किर्लोस्कर उद्योग समूह यांच्यातर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना विद्यापीठ परिसर जलयुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या विज्ञान शिक्षणाच्या प्रचार-प्रसार कार्यासाठी वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रमोद पाटील होते.यावेळी देऊळगावकर यांनी सद्य पर्यावरणीय परिस्थितीची विस्तृत मांडणी केली. युरोपातील अनेक देशांमध्ये कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संकट मांडले जाते आणि ते अधिक प्रभावीपणे नव्या पिढीला भावते परंतु आपल्याकडे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ.पी. एस. पाटील म्हणाले, वसुंधरा वाचली तरच आपले सर्वांचे अस्तित्व टिकणार आहे. त्यासाठी आज आणि आत्ताच प्रत्येकाला जागे होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे. भविष्यात किर्लोस्कर उद्योग समूहासोबत अनेक उपक्रम हाती घेऊन ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.यावेळी किर्लोस्कर समूहाचे सी. जी. रानडे, धीरज जाधव, वीरेंद्र चित्राव, पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव उपस्थित होत्या. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद आजगेकर यांनी आभार मानले.

वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी

  • सुहास वायंगणकर,
  • व्ही. टी. पाटील फाउंडेशन
  • जलमित्र फाउंडेशन, मजले
  • गार्डन्स क्लब
टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण