शिरोळ येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:27+5:302021-09-18T04:25:27+5:30

शिरोळ येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा शिरोळ : येथील पद्माराजे विद्यालयात तहसील कार्यालयाच्या वतीने ई-पीक पाहणी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ...

E-Crop Survey Workshop at Shirol | शिरोळ येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा

शिरोळ येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा

शिरोळ येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा

शिरोळ : येथील पद्माराजे विद्यालयात तहसील कार्यालयाच्या वतीने ई-पीक पाहणी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी ई-पीक पाहणी ॲपविषयी माहिती दिली. याप्रसंगी मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी, प्राचार्य सी. एस. पाटील, उपप्राचार्य टी. आर. गंगधर, तलाठी राजू शिंदे, गौरव कनवाडकर, सोमनाथ शिंदे, धोंडीराम धामणे, अविनाश माने, पांडुरंग पोळ, एम. एन. पाटील उपस्थित होते. एम. आर. पाटील यांनी आभार मानले.

----------

अर्जुनवाडमध्ये गणपती विसर्जन साधेपणाने

अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे गणेश विसर्जन साधेपणाने कोरोनाचे नियम पाळून पार पडले. नुकताच आलेला महापूर व कोरोना परिस्थिती यामुळे मंडळांनी साधेपणात गणेशोत्सव साजरा केला. यावेळी विसर्जन मिरवणुका विनावाद्य काढण्यात आल्या होत्या. अनेक मंडळांनी अनावश्यक खर्चास फाटा दिला.

----------------

रस्त्याचे काम लवकर करा

जयसिंगपूर : अर्जुनवाड ते पाचवा मैल रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: E-Crop Survey Workshop at Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.