डी.वाय.पी. डिप्लोमाच्या २३ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:45+5:302021-06-19T04:17:45+5:30
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांची इन्फोसिससह ...

डी.वाय.पी. डिप्लोमाच्या २३ विद्यार्थ्यांची निवड
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांची इन्फोसिससह विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. विविध कंपन्याच्या कॅम्पस प्लेसमेंटला निवड झाली.
इलेक्ट्रिकलच्या ७, इलेक्ट्रॉनिक्सच्या २, मेकॅनिकलच्या १४ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. मुआजम मकानदार (किणी) याची इन्फोसिस कंपनीमत 'ऑपेरेशन एक्झिक्युटिव्ह' या पदावरती निवड झाली आहे. इलेक्ट्रिकलच्या रोहन चव्हाण, साक्षी भोसले, अंकुश बनसोडे यांची व यांत्रिकी विभागाच्या राहुल बनसोडे, वैभव चव्हाण यांची 'बजाज ऑटो' कंपनीत निवड झाली आहे.
मेकॅनिकलच्या साक्षी शिंदे, प्रतीक्षा घाटगे, प्रियांका खराडे, उत्कर्षा गायकवाड, ओंकार माळी, ओंकार शिंदे, वैभव चव्हाण, राहुल बनसोडे यांची याझाकी इंडिया कंपनीत निवड झाली. इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रतीक्षा निकम, दिव्या पाटील, पूजा पाटील, पल्लवी शिंदे, साक्षी भोसले, रोहित साळुंखे, गणेश बहिरगोंडा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या राहुल चौगुले आणि साक्षी पाटील हिची याझाकी इंडिया या कंपनीत 'डिप्लोमा ट्रेनी इंजिनिअर' म्हणून निवड झाली आहे.
प्राचार्य डॉ. जे. ए. खोत, प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले.