प्रस्थापितांना धूळ, नव्यांना गुलाल!

By Admin | Updated: December 14, 2014 23:44 IST2014-12-14T23:33:12+5:302014-12-14T23:44:53+5:30

प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे आज मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न.

Dust to the Founders, Gully to the Navy! | प्रस्थापितांना धूळ, नव्यांना गुलाल!

प्रस्थापितांना धूळ, नव्यांना गुलाल!


अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ साल काही दिवसांतच काळाच्या पडद्याआड कायमचे लुप्त होत आहे. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे याचा अंदाज बांधणे तर अशक्यच; परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे आज मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न...!

शाचे, राज्याचे व जिल्ह्याचे भवितव्य घडविणाऱ्या दोन महत्त्वाच्या निवडणुका व त्यांमध्ये मतदारांनी जागरूकपणे दिलेला कौल या मागच्या वर्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सगळ्यांत महत्त्वाच्या घडामोडी. त्यामुळे सगळे राजकारण त्याभोवतीच केंद्रित झालेले. या निवडणुकीत जे घडले तो पूर्वरंग होता. त्याचा उत्तररंग आता नव्या वर्षात होणाऱ्या गोकुळ, जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.
लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अन्य सर्व अशीच झाली. विरोधातील सगळ्यांनी ताकद एकवटूनही खासदार राजू शेट्टी यांनी आपला गड लीलया राखला. नेमके तसेच धनंजय महाडिक यांच्याबाबतीतही झाले. त्यांच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष हाच शत्रू होता; परंतु तरीही ते जिंकले. शिवसेनेतील फंदफितुरी त्यांच्या पथ्यावर पडली. विधानसभेला लोकांनी शिवसेनेला बळ दिले. १९५७ पासून पहिल्यांदाच जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. त्याला लोकांपेक्षा त्या पक्षाचे धोरण व उमेदवारांबद्दलची नाराजी हेच जास्त कारणीभूत ठरले. दोन्ही काँग्रेस नको असतील तर जो सक्षम पर्याय होता तो शिवसेनेचा. तो लोकांनी स्वीकारला. पी. एन. पाटील व सतेज पाटील यांचे पराभव काँग्रेसला जिव्हारी लागले. पी.एन. जिंकता-जिंकता हरले. सतेज पाटील यांना ‘कामाचा माणूस’ ही प्रतिमा विजयी करू शकली नाही.
लोकसभेला ज्या शेट्टी यांना जनतेने लढवय्या नेता म्हणून निवडून दिले, विधानसभेला मात्र त्यांना धोबीपछाड दिला. याउलट राष्ट्रवादीचे खासदार महाडिक काँग्रेसच्या मदतीवर निवडून आले व विधानसभेला त्यांनी भाजपला मदत केली तरी लोकांनी त्यांनाच बळ दिले.
आता नव्या वर्षात कोल्हापूर गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समिती या तीन महत्त्वाच्या शिखर संस्थांची निवडणूक होत आहे. त्याशिवाय भोगावती, कुंभी-कासारी, बिद्री आणि राजाराम सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीतील कुरघोडीच्या राजकारणाचे पडसाद तिथे उमटणार आहेत. ‘कुंभी-कासारी’मध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी झुंज होईल. त्याच्या उलट ‘बिद्री’मध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस व शिवसेना एकत्र असेल. ‘भोगावती’मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व शेकाप एकत्र असेल. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागेल. राजाराम कारखान्यात आमदार महादेवराव महाडिक यांचा वरचष्मा असला तरी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्यात कितपत भाग घेतात यावर कुणाची डोकेदुखी वाढणार हे ठरेल.
(उद्याच्या अंकात : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्र)

महापालिका व विधानपरिषद
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये त्यानंतर डिसेंबरमध्ये विधान परिषदेची लढत होईल. सध्या आमदार महादेवराव महाडिक तिथे प्रतिनिधित्व करतात. महापालिकेत ताराराणी आघाडीची मोट बांधण्याचा महाडिक यांचा प्रयत्न राहील. त्यासाठी ‘दिल्ली टूर’ मधून पेरणी सुरु आहे.

विश्वास पाटील

Web Title: Dust to the Founders, Gully to the Navy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.