दुर्गमानवाडमध्ये बंधारा फुटला
By Admin | Updated: August 2, 2014 00:20 IST2014-08-02T00:08:58+5:302014-08-02T00:20:42+5:30
बंधारा बांधण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च

दुर्गमानवाडमध्ये बंधारा फुटला
दुर्गमानवाड : दुर्गमानवाड पैकी नाना पाटीलवाडी येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात आलेला बंधारा तुटल्याने शेजारील शेतकऱ्यांचे भात व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा बंधारा खचला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत रोजगार हमी योजनेतून हा बंधारा बांधण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च झाले होते; पण हे काम निकृष्ट झाल्याने बंधाऱ्याबरोबर वाहून गेले असून, या बंधाऱ्याखाली धोंडिबा पाटील, विठ्ठल पाटील, तुकाराम पाटील, बळवंत पाटील, शंकर पाटील, आदी शेतकऱ्यांच्या भात व ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याची चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. हा बंधारा एक वर्षापूर्वी बांधण्यात आला होता; पण त्याचे बांधकाम चांगले झाले नसल्याने व पाया मजबूत केला नसल्याने तो खचला आहे. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे दुर्गमानवाडचे सरपंच अर्चना वाणे, उपसरपंच नामदेव पाटील, सदस्य धनाजी पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)