‘मुंबई’ने पटकावला दुर्गामाता चषक‘मुंबई’ने पटकावला दुर्गामाता चषक
By Admin | Updated: January 7, 2015 00:55 IST2015-01-07T00:49:45+5:302015-01-07T00:55:44+5:30
विजयी संघास प्रथम क्रमांकाचे ३३ हजार ३३३ रुपयांचे रोख व चषक आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदान

‘मुंबई’ने पटकावला दुर्गामाता चषक‘मुंबई’ने पटकावला दुर्गामाता चषक
कोल्हापूर : मुंबई संघाने सांगली संघावर मात करीत दुर्गामाता भक्त मंडळ व कुचिकोरवी समाज यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रि केट चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सोमवारी कावळानाका येथे झालेल्या सामन्यात मुंबई संघाने सांगली संघावर मात केली. विजयी संघास प्रथम क्रमांकाचे ३३ हजार ३३३ रुपयांचे रोख व चषक आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रविण पुजारी, प्रकाश मुळखे, विनोद पुजारी, प्रताप पुजारी, आनंद माने, संजय तोरस्कर, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील कावळा नाका येथील दुर्गामाता भक्त मंडळ व कुचिकोरवी समाज यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेतील विजेत्या मुंबई संघास विजेतेपदाचा चषक प्रदान करताना आमदार अमल महाडिक. सोबत प्रवीण पुजारी, प्रकाश मुळखे, विनोद पुजारी, प्रताप पुजारी, आनंद माने, संजय तोरस्कर, आदी.