नृसिंहवाडीत दुरंगी काटे की टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:11+5:302021-01-08T05:19:11+5:30

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी :येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले असून दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट ...

Durangi Kate Ki Takkar in Nrusinhwadi | नृसिंहवाडीत दुरंगी काटे की टक्कर

नृसिंहवाडीत दुरंगी काटे की टक्कर

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी :येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले असून दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. याठिकाणी काट्याची टक्कर पहावयास मिळणार आहे.

येथील निवडणुकीत दहा वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा जगदाळे व धनवडे गट एकत्रित निवडणूक लढवत असून, या विरोधात दत्तराज ग्रामविकास महाआघाडीने आपली ताकद उभी केली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत माजी उपसरपंच अशोक पुजारी व अभिजित जगदाळे यांच्यासह समर्थकांचे अर्ज मागे घेतल्यामुळे यांचा पाठिंबा नेमका कोणाला राहणार यावर चित्र स्पष्ट होणार आहे. जगदाळे-धनवडे गटाचे नेतृत्व माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, माजी उपसरपंच अनंत धनवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद पुजारी, मधुकर गवंडी, आदी करीत आहेत, तर दत्तराज ग्रामविकास महाआघाडीचे नेतृत्व माजी ग्रामपंचायत सदस्य विकास पुजारी, मुकुंद पुजारी, गुरुदास खोचरे, माजी उपसरपंच परशुराम गवंडी, श्रीनिवास पुजारी, संतोष खोंबारे, उदय शिरटीकर, आदी करीत आहेत.

गावपुढाऱ्यांची व्यूहरचना

मागील पाच वर्षांच्या विकासकामांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. यंदाची निवडणूक दुरंगी की तिरंगी असे चित्र सुरुवातीला पाहावयास मिळाले होते. मात्र, एकास एक लढत देण्यासाठी पडद्यामागून हालचाली झाल्या. त्यामुळे आता दुरंगी लढत स्पष्ट झाली आहे.

* एकूण प्रभाग - चार

* सदस्य संख्या - अकरा

* मतदान - ३६८९

Web Title: Durangi Kate Ki Takkar in Nrusinhwadi