चंदुरात पारंपरिक गटात दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:38+5:302021-01-13T05:01:38+5:30
चंदूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून महासिद्ध जनसेवा आघाडी विरुद्ध ग्रामविकास आघाडी असे पाटील-शिवरुद्र गट विरुद्ध पाटील-कुगे गट हे पारंपरिक ...

चंदुरात पारंपरिक गटात दुरंगी लढत
चंदूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून महासिद्ध जनसेवा आघाडी विरुद्ध ग्रामविकास आघाडी असे पाटील-शिवरुद्र गट विरुद्ध पाटील-कुगे गट हे पारंपरिक विरोधक आहेत. अनेकवेळा दोन्ही गटांनी सत्ता मिळविली आहे. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी पॅनेलमधून उभा केलेले उमेदवार त्याचबरोबर राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरतात. त्यामुळे उमेदवार निवडताना दोन्ही गटांच्या प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागली. आता राजकीय खेळी कोण यशस्वी करणार, हे निकालावरच ठरणार आहे. दोन्हीही गटांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या नसल्या तरी सत्ता काबीज करण्यासाठी धडपड मात्र सुरू झाली आहे.
गतनिवडणुकीत शिवरुद्र पाटील गटाचे तेरा, तर कुगे-पाटील गटाचे चार सदस्य निवडून आले होते. दोन्ही गटांकडून विकासकामांसाठी एकत्र येण्याऐवजी अनेक प्रकरणांत एकमेकांना विरोध करणे यासह शह-काटशहाचे राजकारण पहायला मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणता गट काय भूमिका जाहीर करतो? त्याचबरोबर त्याचे पालन कितपत करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.