शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची अ‍ॅपेरिक्षाला धडक, बालक ठार, पाच गंभीर, अब्दुललाट-लाटेवारी रोडवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:21 IST

कोल्हापूर : अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर भरधाव डंपरने समोरासमोर अ‍ॅपेरिक्षाला धडक दिल्याने दोन वर्षाचे बालक जागीच ठार झाले.

कोल्हापूर : अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर भरधाव डंपरने समोरासमोर अ‍ॅपेरिक्षाला धडक दिल्याने दोन वर्षाचे बालक जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले. हरिस फिरोज मुल्ला (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे बालकाचे नाव आहे. तर जखमीमध्ये हसन नबी हारुगिरे (वय ५५), राबिया हसन हारुगिरे (५०) उमर फारुख हसन हारुगिरे ( २५), विजेफा हसन हारुगिरे (२६ सर्व रा. अब्दुललाट, ता. हातकणंगले), आसफा फिरोज मुल्ला (२८ रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.  त्यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. अधिक माहिती अशी, रिक्षा व्यवसायिक हसन हारुगिरे हे कुटुंबीयांसह सदलगे (ता. हातकणंगले) येथील नातेवाईकांच्या घरी  दोन दिवस मुक्कामाचे नियोजन करुन आपल्या रिक्षातून रविवारी दूपारी निघाले होते. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर समोरुन आलेल्या खडीच्या भरधाव डंपरने रिक्षाला धडक दिली. त्यामध्ये रिक्षातील सहाजण गंभीर जखमी झाले. हरिसचे डोके रिक्षाच्या लोखंडी पट्टीवर आदळल्याने डोक्याला गंभीर दूखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहीकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमी पोहोचण्यापूर्वी अपघाताची वर्दी रुग्णालय प्रशासनास दिली होती. त्यामुळे डॉक्टरांसह परिचारीका सज्ज होत्या. जखमी दाखल होताच त्यांचेवर तत्काळ उपचार करण्यात आले. अपघाताची वृत्त समजताच लक्षतीर्थ वसाहत, अब्दूललाट व  इचलकरंजी येथील नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर