कोल्हापूरच्या सर्किट बेंचला खोडा
By Admin | Updated: July 21, 2015 01:51 IST2015-07-21T01:51:11+5:302015-07-21T01:51:11+5:30
राज्यात कुठेच नको : मुंबईतील ‘एएडब्ल्यूआय’च्या बैठकीत बेंचच्या बाजूने २५, तर विरोधात १०० मतदान

कोल्हापूरच्या सर्किट बेंचला खोडा
कोल्हापूर : देशभरातील वकिलांची संघटना असलेल्या ‘अॅडव्होकेटस् असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’ (एएडब्ल्यूआय)च्या बैठकीत शंभर वकिलांनी महाराष्ट्रात कुठेच सर्किट बेंच होऊ नये, तर २५ वकिलांनी असे खंडपीठ होण्यास हरकत नाही, असे मत मतदानाद्वारे व्यक्त केले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीला खोडा बसल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी दोन दशकांहून अधिक काळ सुरू आहे. सर्किट बेंचप्रश्नी वकील बांधवांनी यापूर्वी मोर्चे, निदर्शने, रॅली आदी आंदोलने केली आहेत. उन्हाळी अधिवेशनात कोल्हापूर सर्किट बेंचचा ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. त्यानंतर हा ठराव उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहीत शहा यांच्याकडे पाठविण्यात आला. शहा यांनी या ठरावावर अभ्यास करून वकिलांची संघटना असलेल्या ‘अॅडव्होकेटस् असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’ यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्किट बेंचप्रश्नी अभिप्राय मागितला होता. या अभिप्रायासाठी सोमवारी मुंबईतील संघटनेच्या कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. संघटनेकडून त्यासंबंधीचे अभिप्राय मतदान
प्रक्रियेद्वारे नोंदविण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रात कुठेच सर्किट बेंच नको, या बाजूने १०० वकिलांनी मतदान केले तर न्यायप्रक्रिया गतीने होण्यासाठी सर्किट बेंचची गरज असल्याच्या बाजूने २५ जणांनी मतदान केले.
महाराष्ट्रात सर्किट बेंच व्हावे यासाठी कोल्हापूरचे अॅड. अनिल साखरे, अॅड. अशोक मुंडरगी, अॅड. तेजपाल इंगळे, अॅड. बोरूळकर यांनी समर्थनात मतदान केले, तर राजेश पाटील, दरम्यान, बाबर खानने केलेल्या गोळीबारात बबलू मानेची आई अनुसया माने या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबलू ऊर्फ उमेश भीमराव माने (वय ३८, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) व बाबर शमशाद खान (रा. खुशबू मंझील, मळाईनगर, मलकापूर) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बबलू माने हा सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या घरानजीकच्या चौकात वर्तमानपत्र वाचत बसला होता. त्यावेळी बाबर खान त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याजवळील पिस्तुलातून बबलू मानेवर दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बबलू माने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
याचवेळी घरातून बाहेर दुकान उघडण्यासाठी आलेली त्याची आई अनुसया यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने पिस्तुलातून एक गोळी अनुसया यांच्यावर झाडली. ती त्यांच्या पायाला लागली. अनुसया यासुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील युवकांसह नागरिक त्याठिकाणी जमले. या गर्दीतून दहशत माजवित बाबर खान मंगळवार पेठेच्या दिशेने निघाला. घटनास्थळापासून काही अंतरावरच त्याला युवकांनी पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत बाबर खानच्या हातून पिस्तूल खाली पडले. जमावाने त्याला बेदम मारहाण केली. तसेच नजीकच पडलेली एक सिमेंटची पाईप उचलून त्याच्या डोक्यात घातली. त्यानंतर दगडानेही त्याला ठेचण्यात आले. त्यामध्ये बाबर खान जागीच ठार झाला. परिसरातील नागरिक व नातेवाइकांनी जखमी बबलू माने व त्याची आई अनुसया यांना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच बबलू मानेचा मृत्यू झाला, तर अनुसया यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून, अनुसया माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबर खान याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नासिर शमशाद खान यांच्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)