शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

आसमंतात दुमदुमला शिव जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:31 AM

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्टÑाचे दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजन्मकाळ ...

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्टÑाचे दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजन्मकाळ सोहळा, मिरवणुकीमुळे रस्ते शिवभक्तांनी व्यापून गेले. जयंतीनिमित्ताने अवघे शहर भगवे आणि शिवमय झाले होते. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने पारंपरिक बाज राखत, तसेच अत्याधुनिकतेची झालर जोडत काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.कोल्हापूर शहर परिसरात शिवजयंतीचा कमालीचा उत्साह दिसून आला. सकाळपासून चौकाचौकांत शिवप्रतिमांचे, पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. फुलांनी, केळीच्या पानांनी सजवलेले मंडप, भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. पेठापेठांत, गल्लीबोळांत ऐतिहासिक पोवाडे, तसेच स्फुल्लिंग चेतवणारी गाणी ऐकवली जात होती. सायंकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, तसेच मुस्लिम ब्रिगेड यांच्या मिरवणुकीने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले. मिरजकर तिकटी येथील मावळा ग्रुप तर्फे सकाळी १०० वादकांच्या रणांगण ढोलपथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी दिली.शिवज्योतींची दौड, कार्यकर्त्यांचा उत्साहसोमवारी रात्रभर शिवज्योत नेण्याची धांदल सुरूहोती. शिवज्योतींची ही दौड मंगळवारी सकाळपर्यंत सुरूहोती. ज्योत प्रज्वलित करणे आणि तिचे स्वागत धुमधडाक्यात सुरूहोते. सकाळी १0 वाजून १0 मिनिटांनी मोठ्या उत्साहात शिवजन्मकाळ पार पडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. अनेक स्त्री-पुरुष शिवभक्तांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा करून भगवे फेटे बांधले होते.येथील मध्यवर्ती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौक, महानगरपालिकेचे शाहू सभागृह येथील छत्रपतींच्या पुतळ्याभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय अनेक मंडळांनीही विद्युत रोषणाई साकारली होती. शहरात सर्वत्र शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाची महती सांगणारे फलक उभारण्यात आले होते; त्यामुळे शहरातील वातावरण भगवे आणि शिवमय होऊन गेले.