जवाहरलालजी दर्डा यांच्या विचारांमुळेच ‘लोकमत’चे महाराष्ट्रात पहिले स्थान
By Admin | Updated: November 26, 2014 00:39 IST2014-11-26T00:39:19+5:302014-11-26T00:39:49+5:30
प्रज्ञा पोतदार : इचलकरंजी येथे आदरांजली

जवाहरलालजी दर्डा यांच्या विचारांमुळेच ‘लोकमत’चे महाराष्ट्रात पहिले स्थान
इचलकरंजी : स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी राजकारणी असूनही ‘लोकमत’चे स्वतंत्र अस्तित्व ठेवले. वृत्तपत्रातील विचार आणि त्या विचारांचे पावित्र्य सांभाळले, जोपासले. त्यामुळे ‘लोकमत’ महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र बनले, असे उद्गार नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी काढले.
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त इचलकरंजी विभागीय कार्यालयात नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यावेळी प्रज्ञा पोतदार बोलत होत्या. सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पो.नि. संजय साळुंखे, भीमानंद नलावडे, सतीश पवार, माजी नगराध्यक्षा सुमन पोवार, नगरसेविका रेखा रजपुते, सुजाता बोंगाळे, तेजश्री भोसले, सुरेखा इंगवले, आदींनी दर्डा यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत मंगळवारी ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांना आदरांजली वाहताना नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार. यावेळी नगरसेविका सुरेखा इंगवले, शकुंतला मुळीक, तेजश्री भोसले, रेखा रजपुते, सुजाता बोंगाळे, सुमन पोवार, आदी उपस्थित होत्या.