शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

Kolhapur: 'केशवराव'चे काम, किती महिने थांब; दुसरा टप्पा अजून कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:48 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरामदायी कामकाज पद्धतीमुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे ९ ऑगस्टला उदघाटन हे सध्यातरी दिवास्वप्न ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरामदायी कामकाज पद्धतीमुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे ९ ऑगस्टला उदघाटन हे सध्यातरी दिवास्वप्न झाले आहे. शाहू महाराजांची आठवण म्हणून या वास्तूबद्दल कलाकारांची, कोल्हापूरकरांची आत्मियता लक्षात घेऊन तरी शासकीय काम सहा महिने थांब ही म्हण या बाबतीत खरी करण्याची आवश्यकता नव्हती. पण वास्तूच्या फेज २ आणि फेज ३ बद्दल दुर्दैवाने हाच वाईट अनुभव येत आहे.कोल्हापूरच्या कलापरंपरेचा आणि कलासक्त राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्टला आगीत भस्मसात झाले. याचे चटके आणि झळ सर्वांच्या जिव्हारी लागल्याने शासन, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूरकरांनी मिळून वर्षभरात वास्तू नव्याने पूर्वी होती त्या दिमाखात उभारण्याचा संकल्प केला.देशातील नामांकित अशा स्ट्रक्टवेल कंपनीने याची जबाबदारी घेतली, आचारसंहितेपूर्वी पहिल्या टप्प्यातील निविदा मंजूर झाली. मलब्यामुळे तीन महिने काम करता आले नाही तरी तरीही कंपनीने पहिला टप्पा वेगाने पुढे नेला. पण महापालिकेकडून ज्या वेगाने तांत्रिक बाजूंनी सहकार्य अपेक्षित आहे ते होत नसल्याने ९ ऑगस्टपूर्वी नाट्यगृहाचे काम संपणार नाही. 

दुसऱ्या टप्प्याच्या स्क्रुटिनीला महिना..केशवरावच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा ७ तारखेला निघाली. त्यानंतर गेली तीन आठवडे फक्त कॉन्ट्रॅक्टरची स्क्रुटिनी करण्यात महापालिकेने वेळ घालवला आहे. एका प्रस्तावाची फाइल महापालिकेकडे गेली की प्रत्येक टेबलवर ती फाइल एक आठवडा असते. असे किमान चार टेबल धरले तर एक महिना यातच जातो. केशवरावच्या प्रत्येक बाबतीत कर्मचारी आणि संबंधित यंत्रणेकडून असा वेळखाऊपणा केला जात आहे. बरं महापालिकेच्याच यंत्रणेची तक्रार प्रशासकांकडे कशी करायची हाही प्रश्न आहे.

तिसऱ्या टप्प्याची निविदाच नाही..केशवरावचे काम ९ ऑगस्टपूर्वी संपवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक बाजूंची मान्यता तातडीने करून हवे आहे. पण महापालिकेकडून आरामदायी, आपल्या सोयीने, जमेल तसे अशा शासकीय मानसिकतेतून काम सुरू आहे. त्यामुळे ९ ऑगस्टला केशवरावमध्ये शुभारंभाचा प्रयोग होणे अवघड आहे. महापालिकेने वेग वाढवला, ठेकेदाराने मनावर घेतले, अधिक मनुष्यबळ वापरले तरच ते शक्य आहे.

टप्पे आणि कामफेज १ : वास्तूचे जतन संवर्धन (७.२० कोटी)फेज २ : आर्किटेक्चरल काम, इंटिरिअर डिझाइन, ऑडिटोरिअम (४ कोटी)फेज ३ : रंगमंच, लायटिंग, ड्रेपरी, मेकअप रुम, साऊंड सिस्टिम. (१९ कोटी )फेज ४ : मूलभूत सोयी-सुविधा, ड्रेनेज, सुशोभीकरण, पार्किंग (२० कोटी)

केशवरावचे काम प्राधान्याने करण्यावरच भर आहे. पण निविदा प्रक्रिया, त्याची स्क्रुटिनी, ऑडिट अशा गोष्टींना वेळ लागत आहे. तरीही महापालिकेच्या पातळीवर यात सुधारणा करून लवकरात लवकर तांत्रिक बाबू पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. - नेत्रदीप सरनोबत , शहर अभियंता

टॅग्स :kolhapurकोल्हापूर