शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीस आम्ही तयार आहे, पण..; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:59 IST

महापालिकेची लवकरच निवडणूक घेऊ

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्यास आम्ही तयार आहे; पण काही लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. मतमतांतरे आहेत. त्यामुळे हा निर्णय होत नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शहरातील विविध प्रश्न आणि विकासकामासंबंधी महापालिका उदासीन असल्याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, महापालिकेची लवकरच निवडणूक घेऊ. नगरसेवक आल्यानंतर कामे होतील; पण सभागृह असताना याच शहराने तीन, तीन महिन्यांचे आणि चार महिन्यांचे महापौर पाहिले आहेत. हेही विसरून चालणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.पंचगंगा प्रदूषणावर दोन दिवसांत बैठकते म्हणाले, पंचगंगा नदीला महापूर येऊ नये म्हणून अलमट्टी येथून पाण्याचा विसर्ग करण्यासंबंधी कर्नाटक शासनाकडून यंदा सहकार्य मिळाले. समन्वय चांगला राहिला. तिथे महाराष्ट्र जलसंपदा विभागाने एका अभियंत्यांची नियुक्तीही केली आहे. मी अनेक वर्षे जलसंपदा विभागाचा मंत्री होतो. मलाही चांगले माहीत आहे, की राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर वेगाने पाणी पुढे सरकत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या भराव्यामुळे नदीतील पाणी पुढे जात नाही, असे निदर्शनास आले आहे. या प्रश्नासंंबंधी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे. यातून काही मार्ग काढण्यासंबंधी चर्चा करणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर आहे. यावर मुख्य सचिवांसोबत येत्या दोन दिवसांत बैठक होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार