शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या अपत्यामुळे नोकरी आली धोक्यात -कोल्हापूर जिल्हा परिषदेत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 21:34 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव अजित मगदूम यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील ग्रामस्थाने तिसºया अपत्याबाबत तक्रार केली असून, त्यामुळे मगदूम यांची नोकरी धोक्यात आली आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतीकर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव अजित मगदूम यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील ग्रामस्थाने तिसऱ्या अपत्याबाबत तक्रार केली असून, त्यामुळे मगदूम यांची नोकरी धोक्यात आली आहे.मगदूम हे करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्याच गावचे शाहू पांडुरंग चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेकडे मगदूम यांना २00५ नंतर तिसरे अपत्य झाल्याची लेखी तक्रार केली आहे. केवळ तक्रार न करता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र चुकीचे दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे.

मगदूम यांना २00५ आधी दोन मुली असून त्यांना १३ नोव्हेंबर २0१२ रोजी मुलगा झाला आहे. याबाबतची इस्पुर्ली (ता. राधानगरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कागदपत्रेही अर्जासोबत जोडण्यात आली आहेत. शासकीय नियमानुसार सरकारी सेवेत असणाºया कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यास २00५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते.

हा अर्ज आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामसेवक यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मगदूम यांना अपत्य झाल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा देण्यात आला आहे. याबाबत आता मगदूम यांना रीतसर नोटीस काढली जाणार असून, त्यांचेही याबाबतचे म्हणणे घेण्यात येणार आहे. त्यांचे म्हणणे घेतल्यानंतर मग पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मगदूम हे कर्मचारी महासंघाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कर्मचाºयांवर अन्याय झाल्यानंतर ते नेहमी त्याचे निवारण करण्यासाठी अग्रेसर असतात. सध्या ते गगनबावडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ सहायक म्हणून सेवेत आहेत. मगदूम यांच्याबाबत ही तक्रार झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे.

अशा पद्धतीची तक्रार झाल्याचे मला समजले आहे. याबाबत प्रशासनाकडून काही विचारणा झाल्यास मी माझे म्हणणे त्यांना देईल; परंतु कशामुळे ही तक्रार झाली याविषयी मी अनभिज्ञ आहे.- अजित मगदूम 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर