हलक्या पावसाने शहरवासीय सुखावले
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T01:03:40+5:302014-07-08T01:06:37+5:30
वातावरणात गारवा

हलक्या पावसाने शहरवासीय सुखावले
कोल्हापूर : पावसाची आस लागून राहिलेल्या शहरवासीयांना आज, सोमवारी रात्री नऊपासून पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी सुखावले. रात्री उशिरापर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातावरणात गारवा पसरला. कोल्हापूरकरांना प्रथम संपूर्ण जून महिना कोरडा गेला.
अखंड जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने वातावरणात कमालीचे उष्मा वाढला होता. रात्रीच्या सुमारास गार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्याने वातावरण आल्हादायक बनले. (प्रतिनिधी)