शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

डॉल्बी वाजला नसल्याने ध्वनिप्रदूषण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 18:47 IST

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव आणि मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजला नसल्याचा सकारात्मक परिणाम यंदा ध्वनिप्रदूषण घटण्यावर झाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने कोल्हापूर शहरातील विविध २२ ठिकाणी ध्वनिपातळीचे मापन केले. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले.पर्यावरणशास्त्र विभागाने दि. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या ...

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी; कोल्हापूर शहरातील गणेशोत्सवातील चित्रशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाकडून मापन शहरातील विविध २२ ठिकाणी ध्वनिपातळीचे मापन

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव आणि मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजला नसल्याचा सकारात्मक परिणाम यंदा ध्वनिप्रदूषण घटण्यावर झाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने कोल्हापूर शहरातील विविध २२ ठिकाणी ध्वनिपातळीचे मापन केले. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले.

पर्यावरणशास्त्र विभागाने दि. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ध्वनिपातळीचे मापन केले. यात यंदा ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले. मिरवणुकीमध्ये बिनखांबी गणेश मंदिर आणि गंगावेश येथे ध्वनीची पातळी थोड्या प्रमाणात वाढलेली दिसते. मात्र, अन्य ठिकाणी ती कमी झालेली आहे.

यावर्षीची ध्वनिपातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) निश्चित केलेल्या मानकांपेक्षा वाढलेली आहे. पण, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी आहे. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, एस. बी. मांगलेकर, पल्लवी भोसले, सी. एस. भोसले, विद्यार्थी अविनाश माने, विकास हरेर यांनी ध्वनिपातळी मापनाचे काम केले.

दरम्यान, ध्वनिपातळीच्या मापनाबाबत पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापुरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी यावर्षी घटली आहे. मात्र, सीपीसीबीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक पातळीहून ती अधिक आहे. यावर्षीच्या ध्वनिपातळीत स्टिरिओ साउंड, ढोल-ताशा, बँजो, ट्रॅक्टर, जनरेटर आणि लोकांच्या रहदारीच्या आवाजाचा समावेश आहे.

‘सीपीसीबी’च्या मार्गदर्शक सूचीनुसार कोल्हापुरातील रहिवासी, शांतता, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ध्वनिमापक उपकरणाद्वारे (साउंड लेव्हल मीटर) डेसिबल या एककात याचे मोजमाप केले. डॉल्बी बंदीला मंडळांनी सकारात्मक पाठबळ दिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. हा चांगला बदल आहे.

ध्वनिप्रदूषणाची पातळी(डेसिबलमध्ये, मिरवणुकीदिवशी सकाळी दहा ते रात्री बारापर्यंतचे मापन)

क्षेत्र परिसर सन २०१५ २०१६ २०१७शांतता सीपीआर ७१.८ ६७.६ ५५.६३न्यायालय ७१.९ ६३.२ ५८.०९जिल्हाधिकारी कार्यालय ६४.७ ६४.१ ५६.२४शिवाजी विद्यापीठ - ५५.२ ४६.३६निवासी राजारामपुरी ६१.२ ६२.४ ४९.१३उत्तरेश्वर पेठ ७३.४ ६३.५ ६६.२४शिवाजी पेठ - ६३.८ ५०.९६मंगळवार पेठ - ७९.९ ६०.८५नागाळा पार्क - ५८.५ ५०.९६ताराबाई पार्क - ६१.८ ४८.२४वाणिज्य मिरजकर तिकटी - ९६.१ ७७.७५बिनखांबी गणेश मंदिर - ९६.५ ८४.६६महाद्वाररोड १०३.५ ९९.५ ७१.६३गुजरी १०३.९ ९७.७ ७४.९२पापाची तिकटी - ९८.६ ८२.७३राजारामपुरी - ७०.२ ६३.७२लक्ष्मीपुरी - ६७.८ ७२.५२शाहूपुरी - ६७.७ ५४.१३गंगावेश - - ८५.४३बिंदू चौक - - ७७.३६औद्योगिक उद्यमनगर ६७.५ ६७.५ ५५.६२वाय. पी. पोवारनगर ६७.० ६१.३ ५४.३३‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक पातळी(डेसिबेलमध्ये, रात्रीच्या वेळी)

क्षेत्र                      पातळीशांतता                     ४०निवासी                    ४५वाणिज्य                  ५५औद्योगिक             ७०