शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडले,  कोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:41 IST

टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देआवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडलेकोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्याशेतकरी आर्थिक संकटात; उत्पादन खर्चही निघेना

संदीप बावचे

जयसिंगपूर : टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, चिपरी, नांदणी, जैनापूर या परिसरात टोमॅटोचे पिक घेतले जाते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली. परंतु सध्या टोमॅटोला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात दहा रुपये किलो असणारा टोमॅटो आता पाच रुपये किलो दराने विकला जात आहे.सध्या जागेवर तीन ते चार रुपये किलो दराने व्यापा-यांकडून टोमॅटोची मागणी होत आहे. वाहतुक खर्च, काढणी खर्च याचा हिशोब घातल्यास टोमॅटोचे पिक न परवडणारे बनले आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोला प्रतिकिलो एक ते दोन रुपये प्रमाणे शेतक-याला पैसे मिळत आहेत.कोथळी (ता.शिरोळ) येथील शेतक-यांकडून आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या जात आहेत. तर समाधानकारक बाजारभाव नसल्याने तसेच वाहतुक खर्चही निघत नसल्याने काही शेतक-यांनी उभ्‍या पिकात शेळ्या, मेंढ्या चरावयास सोडल्या आहेत.

 

टोमॅटोला भाव नसल्याने सुमारे ८०० पेटी निघणारा असा एकूण २० हजार किलो टोमॅटोच्या पिकात शेळ्या, मेंढ्या चरायला सोडून दिल्या. तोडणी व वाहतुक खर्च अंगावर बसत असल्याने टोमॅटोची तोडणी बंद केली आहे. दलालांच्या संकटातून अजूनही शेतकरी सुटलेला नाही.- कुबेर चौगुले, शेतकरी कोथळी 

दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिक सध्या तसेच सोडून दिले आहे. कर्नाटकातून येणारा व शितगृहामुळे टोमॅटोची आवक वाढली आहे. शासनाकडे ऊस क्षेत्राबाबत माहिती असते. मात्र, टोमॅटोसह भाजीपाला पिकाची माहिती नसते. त्यामुळे सरसकट शेतकरी कमी कालावधीतला भाजीपाला पिकवितो. त्यामुळे शासनाने भाजीपाला पिकाची नोंद करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.- अनिल मगदूम, शेतकरी कोथळी 

भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने वेळेत त्याची विक्री होणे गरजेचे आहे. एकीकडे औषध कंपन्या पिकाची हमी देतात तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.- सुभाष पाटील, शेतकरी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीFarmerशेतकरी