शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांची झाडाझडती सुरू, विशेष पोलीस महानिरीक्षक स्वत: करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:03 IST

वर्षभरात किती गुन्हे दाखल झाले, किती उघडकीस आले, पोलीस ठाण्याचे कामकाज अद्ययावत आहे का? हद्दीमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती मोहीम राबविली, यासह अन्य कामांची झाडाझडती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारपासून सुरू केली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांची झाडाझडती सुरूविशेष पोलीस महानिरीक्षक स्वत: करणार तपासणीकामचुकार अधिकारी, पोलिसांनी घेतला धसका

कोल्हापूर : वर्षभरात किती गुन्हे दाखल झाले, किती उघडकीस आले, पोलीस ठाण्याचे कामकाज अद्ययावत आहे का? हद्दीमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती मोहीम राबविली, यासह अन्य कामांची झाडाझडती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारपासून सुरू केली.

पोलीस मुख्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह २९ पोलीस ठाण्यांची झडती घेणार आहेत. नांगरे-पाटील यांच्याकडून होणाऱ्या या तपासणीचा ‘धसका’ बहुतांश पोलीस ठाण्यांनी घेतला असून, वर्षभरातील कामचुकार कर्मचारी आता रात्रं-दिवस काम करताना दिसून येत आहेत; तर वर्षभर ‘हत्तीच्या चाली’प्रमाणे कामकाज करणाऱ्या काही पोलीस ठाण्यांनी कारवाईचे कागद रंगविण्यासाठी बनावट छापे टाकण्याचे काम सुरू केले आहे.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते. वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील स्वत: सर्व पोलीस ठाण्यांना बुधवारपासून भेटी देऊन पाहणी व तपासणी करणार आहेत.

नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, आदी कार्यक्षेत्रांतील कामकाज पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीची त्यांना चांगली ओळख आहे. त्यामुळे २९ पोलीस ठाण्यांच्या कामकाजात काही त्रुटी आढळून येऊ नयेत, यासाठी ठाण्याचे प्रमुख स्वत:हून लक्ष घालून अपुरे काम पूर्ण करून घेत असताना दिसत आहेत.

पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सर्व पोलीस उपअधीक्षक, मुख्यालयातील सर्व विभागांसह पोलीस ठाण्यांना लेखी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये मागील लेखातपासणी अनुषंगाने रोजकीर्द नोंदवा, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुके अद्ययावत ठेवावीत.

बँक शिल्लक रकमेप्रमाणे रोजकिर्दीशी ताळमेळ करावा, दरमहा शिल्लक रकमेचा आढावा घेतल्याच्या नोंदी ठेवाव्यात, चलनाने जमा करण्यात आलेल्या महसुली जमेची पडताळणी करण्यात यावी, सर्वप्रकारची दंड वसुली सुरू आहे किंवा नाही याची पडताळणी करावी, आपली तपासणी लावल्यास तपासणी पथकास माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूर