शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

एफआरपी वाढवल्यामुळे यंदा शेतक-यांना 3400 रुपयांचा पहिला हप्ता मिळणार -  सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:56 IST

केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चितपणे मिळणार आहे, असे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

इचलकरंजी - केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात मंत्री खोत बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती. खोत पुढे म्हणाले रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून ती शेतकर्‍यांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणार्‍यांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करुन माझ्यामुळेच शेतकर्‍यांचा प्रश्‍न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकर्‍यांसाठी लढलो असून त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टीफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मगितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकर्‍याला असून कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही. 

देशात सरासरी 235 ते 245 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र गरज 250 ते 260 लाख मेट्रीक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने सखरेचे दर स्थिर रहाणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार 9.5 टक्के साखर उतार्‍यासाठी 2550 रुपये, 12 टक्क्याला 3220 आणि 13 टक्क्याला 3486 रुपये प्रति टन असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सरासरी 12.50 टक्के साखर उतार्‍यामुळे 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक 300 रुपये अधिक असा दर कारखांदारांनी द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार 70:30 हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सरकार ऐकत नसेल तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले. स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतिश वुरूलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधवर आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा लाभ 50 लाख शेतकर्‍यांना मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच 2018 पर्यन्त नियमित कर्जाची परतफेड करणार्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे.

पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.

प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वेग-वेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला,असा सवाली खोत यांनी केला.

टॅग्स :Farmerशेतकरी