शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 15:39 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.

ठळक मुद्देपावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंदअधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी भेडसी ते राज्य हद्दमध्ये राज्य मार्ग क्रमांक १८९ या मार्गावरील तिलारी घाटामध्ये ३0 मीटर लांबीचा रस्ता खचल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ५ जुलै पासून बंद असून आजरा, अंबोली, सावंतवाडी मार्गे वाहतूक सुरु आहे.पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, शिरदवाड राज्य मार्ग क्र. १९२ या मार्गावरील इचलकरंजी येथील मोठ्या पुलावरील वाहतुक बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काल सायंकाळी ७ वाजल्यापासून बंद असून पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे.करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता ऊजळाईवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक १९४ मार्गावर शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर फुटभर पाणी असल्याने ३१ आॅगस्ट रोजी वाहतूक बंद झाली आहे.करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव या प्रमुख जिल्हा मार्गावर कोगे बंधाºयावर २ फुट पाणी असल्यामुळे ३१ आॅगस्टपासून बालिंगा, दोनवडे, घानवडे मागार्ने वाहतूक सुरु आहे. आय.टी.आय. पाचगांव खेबवडे ते बाचणी प्र.जि.मा. क्र. ३0 मार्गावर खेबवडे गावाजवळ २ फूट पाणी आल्यामुळे वाहतूक बंद असूनपयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे.शिरोली दुमाला बाचणी प्रजिमा क्र. ३७ मार्गावर बाचणी बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे. येवती पाटी बाचणी प्रजिमा क्र. ४२ बाचणी बंधाºयावर पाणी असल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.शिरोळ तालुक्यातील अतिग्रे, शिरढोण, मजरेवाडी, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द रा.मा. २00 मार्गावर शिरढोण पुलावर ५ फुट पाणी तसेच मजरेवाडी ते अकिवाट गावाजवळ पाणी असल्याने वाहतूक बंद असून नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.काल सकाळपासून बस्तवडे बंधाºयावर ३ फूट पाणी असल्याने कागल तालुक्यातील बिद्री-सोनाळी-बस्तवडे प्रजिमा क्र. ४६ या मार्गावरील वाहतूक बंद असून इजिमा क्र. १८९ अनुर ते बानगे व इजिमा क्र.९३ बानगे मार्गे वाहतूक सुरू आहे.राधानगरी तालुक्यातील आरे सडोली-खालसा, राशिवडे बु.,शिरगांव प्रजिमा क्र. ३५ या मार्गावरील शिरगाव बंधाºयावर पाणी असल्याने वाहतुक बंद आहे. तारळे व राशिवडे मार्गे वाहतुक सुरु आहे. सरवडे, मालवे, तुरंबे प्रजिमा क्र. ९८ तुरंबे बंधाºयावर पाणी असल्याने वाहतुक बंद आहे. सरवडे, मुदाळ व तिट्टामार्गे वाहतुक सुरु आहे.शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारूण उदगिरी प्र.जि.मा.क्र.१ मार्गावरील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी आल्यामुळे कालपासून वाहतूक बंद आहे. शित्तूर तुरूकवाडी मलकापूर मार्गे पयार्यी वाहतूक सुरू आहे.माळवाडी पुलावर पाणी आल्यामुळे शाहुवाडी तालुक्यातील तुरूकवाडी कोतोली रेठरे सोंडोली खेडे शित्तूर तर्फ वारूण प्रजिमा क्र. ३ मार्गावरील कालपासून वाहतूक बंद आहे, मात्र तुरूकवाडी-कोकरूड-शेडगेवाडी-आरळा-शित्तूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.गडहिंग्लज तालुक्यातील निलजी,नूल, येणेचवाडी,नंदनवाड प्रजिमा ८६ या मार्गावर बंधाºयावर पाणी असल्याने निलजी-नुल मार्गे वाहतूक बंद, दुंडगे-जरळी-मुंगळी-नुल मार्गे वाहतूक सुरू आहे.गगनबावडा तालुक्यातील शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु., परिते प्रजिमा क्र.३४ या मार्गावर आंदुर बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे अनदुर, मणदुर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्र. २५ मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.परखंदळे, आकुर्डे, धुंदवडे, जर्गी गगनबावडा प्रजिमा क्र .३९ या मार्गावर गोठे पुलावर १ फूट पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. मल्हारपेठ सुळे कोदवडे प्रजिमा २६ मार्गे पयार्यी वाहतूक सुरु आहे.आजरा तालुक्यातील नवले देवकाडगांव साळगाव प्रजिमा क्र.५८ या मार्गावर साळगाव बंधाºयावर ३ फूट पाणी असल्यामुळे पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरroad transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूरstate transportएसटी