शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचा घोळ, पाण्याचा बट्ट्याबोळ वारंवार कोल्हापूर शहर पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:21 IST

गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

ठळक मुद्देनागरिक कमालीचे वैतागले

कोल्हापूर : गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जुनाट यंत्रणा, ती दुरुस्त करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि अधिकाºयांची अकार्यक्षमता यांमुळे यांत्रिक बिघाडापेक्षा मानसिक बिघाडच अधिक झाल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. गेले आठ दिवस सतत या जलशुद्धिकरण केंद्रात यांत्रिक बिघाड होत असतानाही वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नसल्याने शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा जलशुद्धिकरण केंद्र बंद पडले.

चार उपसा केंद्रे आणि तीन जलशुद्धिकरण केंद्रे असूनही गेल्या महिन्याभरात तांत्रिक बिघाड आणि अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांचा घसा कोरडा होऊ लागला आहे. आठ दिवसांत सहा वेळा बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र बंद ठेवावे लागले आहे; यावरूनच या केंद्रातील कालबाह्ण यंत्रणा आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६.४५ वाजता या केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाला होता. तो दुरुस्त करेपर्यंत रात्रीचे ९.१५ झाले. त्यामुळे उपसा आणि पुरवठा बंद ठेवण्याची प्रशासनावर नामुष्की ओढवली.

शनिवारी दुपारपर्यंत बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र व्यवस्थित सुरू राहिले; परंतु चार वाजता अचानक वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. त्यामुळे केंद्राची सर्व प्रक्रिया बंद ठेवावी लागली. जलशुद्धिकरण केंद्र चोवीस तास व्यवस्थित सुरू राहिले आणि चंबुखडी टाकीला पुरेसे पाणी मिळाले तरच संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच उपनगरांतील अनेक भागांना पाणीपुरवठा व्यवस्थित होतो. मात्र गेल्या आठ दिवसांत जलशुद्धिकरण केंद्र तब्बल सहा वेळा अनेक तासांसाठी बंद पडले. जरी ते सुरू झाले तरी विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत व्हायला पुन्हा एक दिवस जावा लागतो. बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील वायरिंग, ट्रान्स्फॉर्मर्स, पंप, पॅनेल बोर्ड कालबाह्ण झाले आहेत. वास्तविक गेल्या काही वर्षांत ही यंत्रणा दुरुस्त व सक्षम करणे आवश्यक होते; पण प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

पाण्याचे टॅँकरही मिळत नसल्याच्या तक्रारीज्यावेळी पाणी येत नाही त्यावेळी पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून दिले जातात; पण अलीकडे पाण्याचे टॅँकरही मिळत नसल्याने नागरिकांची तक्रार आहेत. शहरातील सी व डी वॉर्ड हा दाट वस्तीचा असल्याने पाण्याची साठवणूक करणे नागरिकांना अशक्य आहे. त्यामुळे रोज पाणी मिळाले नाही तर मात्र नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे टॅँकर द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. 

उद्या पुन्हा पाणीपुरवठा बंदउद्या, सोमवारी बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र ते चंबुखडी मार्गावरील जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सी व डी वॉर्डांसह उपनगर भागाचा पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवला जाणार आहे, तर मंगळवारी (दि. १४) तो अपुऱ्या दाबाने होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई