ठेकेदारांमुळेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रास ‘खो’

By Admin | Updated: November 12, 2014 00:17 IST2014-11-12T00:12:46+5:302014-11-12T00:17:05+5:30

अडचणी वाढल्या : ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान

Due to the contractors' wastage of waste water | ठेकेदारांमुळेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रास ‘खो’

ठेकेदारांमुळेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रास ‘खो’

संतोष पाटील -- कोल्हापूर कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट) कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारीपूर्वी सुरू करण्यासाठी महापालिकेची धावाधाव सुरू आहे. सहा फूट व्यासाची शेतातून जाणारी पाईप आता ऊस तोडणीमुळे रखडण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीनंतर आता तांत्रिक कारणात अडकलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी न्यायालयाचा तगादा असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढत आहेत. न्यायालयाचा आदेश, पर्यावरणप्रेमींचा दबाव, ठेकेदाराची अकार्यक्षमता, यामुळे केंद्राची जुजबी चाचणी घेऊन निवडणूक कॅश करण्यासाठी थाटात उद्घाटन घेणारे प्रशासन पुरते हबकले आहे.
शहरातील सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेला एप्रिल २०१३ची ‘डेडलाईन’ दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यामध्ये वाढ करत ३१ मार्च २०१४ पर्यंत कें द्र सुरू करणे महापालिकेला बंधनकारक होते. यानंतर वीज जोडणी करताना कमी दाबाचा ट्रान्स्फॉर्मर असल्याचे लक्षात आल्याने ३१ मेपर्यंत मुदत वाढविली. १५ जुलैपर्यंत जुजबी चाचण्या घेत २८ जुलैला उद्घाटनाचे सोपस्कारही पूर्ण केले. मात्र, सहापैकी फक्त दोन सी-टेक केबिन अंशत: सुरू होत्या. परंतु, सेंट्रिफ्युज सिस्टीम, क्लोरिनेशनची सोय, सांडपाणी घेऊन येणाऱ्या व शुद्ध पाण्याचे वहन करणाऱ्या पाईपलाईनची कामे, लाईन बझार व बापट क ॅम्प येथील पाणी आणण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचा दावा प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने न्यायालयात केला. यामुळे महापालिका प्रशासन व ठेकेदाराची लबाडी उघड झाली.

काम त्वरित सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश
सांडपाणी प्रक्रिया केंद्र ३१ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी महापालिकेत आयुक्त कार्यालयात पंचगंगा प्रदूषणाशी संबंधित सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक झाली. सद्य:स्थितीचा आढावा घेऊन त्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केंद्राचे ठेकेदार विश्वा इन्फ्राचे सुरिंदर यांना दिले. प्रक्रियेनंतरचे पाणी वाहून नेणारी पाईप टाकण्याचे काम अपूर्ण आहे. लवकरच हे सुरू करू, अशी माहिती सुरिंदर यांनी दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ठेकेदारास चांगलेच फैलावर घेतले.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा महापालिके चा प्रयत्न सुरू आहे. उपकरण बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यानंतरच्या कामास अद्याप ठेकेदाराने गती घेतलेली नाही. पाईपलाईनचे काम पूर्ण होताच प्रक्रिया केंद्र पूर्णक्षमतेने सुरू होईल.
- आर. के. पाटील (पर्यावरण अभियंता - महापालिका)

अधिभाराचे आठ कोटी जमा
चाचणी परीक्षणादरम्यान उच्च न्यायालयास अहवाल देण्यापूर्वी, तसेच उद्घाटनापूर्वी एक दिवस, असे एकूण तीन दिवसच ‘एसटीपी’ सुरू झाले. एक एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्राची सध्याची क्षमता ७६ एमएलडी आहे. यानुसार प्रतिदिन ६७ हजार ७२८ रुपये महापालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च करावे लागतील. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची घातलेली ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. गेल्या वर्षी साडेचार कोटी व आॅक्टोबरअखेर साडेतीन कोटी, असे एकूण आठ कोटी रुपये प्रक्रिया केंद्र सुरू होण्यापूर्वीच जमा झाले आहेत.

Web Title: Due to the contractors' wastage of waste water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.